बॉक्स ऑफिसवर 'Vicky Vidya Ka Woh Wala Video'ची तुफान कमाई, आलिया भट्टच्या 'Jigra'ची परिस्थिती काय
दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ११ ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’, ‘जिगरा’ हे दोन सिनेमे एकत्र रिलीज झाले आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या ह्या सिनेमांना प्रेक्षक संमिश्र प्रतिसाद देताना दिसत आहेत. प्रेक्षक सर्वाधिक प्रतिसाद राजकुमार रावच्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ चित्रपटाला की आलिया भट्टच्या ‘जिगरा’ला सर्वाधिक प्रतिसाद देत आहेत, जाणून घेऊया…
हे देखील वापरा – आलिया भट्टच्या ‘जिगरा’ने केली एवढीच कमाई, कलेक्शनबाबत कंगना रणौतने शेअर केली पोस्ट!
११ ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर, राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ चित्रपट आणि आलिया भट्ट स्टारर ‘जिगरा’ चित्रपट रिलीज झालेला आहे. दोन्हीही वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे असून प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रतिसाद राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ चित्रपटालाच मिळत आहे. राज शांडिल्य दिग्दर्शित चित्रपटाला प्रेक्षकांचा अफलातून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी आलिया भट्टचा ‘जिगरा’ आणि अमिताभ बच्चन-रजनीकांत यांच्या ‘वेट्टाऐं’शी (vettaiyan) स्पर्धा करावी लागली. या परिस्थितीतही चित्रपटाने ५ कोटींची कमाई केली आहे.
हा कमाईचा आकडा फार जास्त नाही. पण इतर चित्रपटांच्या कमाईच्या तुलनेत राजकुमार राव स्टारर चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ हा चित्रपट हलका- फुलका विनोदी चित्रपट आहे, जो केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच करत नाही तर एक सामाजिक संदेशही देतो. चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये जोरदार प्रमोशन केलं होतं. चित्रपटाच्या स्टारकास्टने जबरदस्त प्रमोशन करत ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ची चाहत्यांमध्ये क्रेझ निर्माण केली होती. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ चित्रपटाने ५ कोटींची कमाई केली आहे. ‘जिगरा’ चित्रपटाने ४.५५ कोटींची कमाई केली आहे. येत्या ‘दसरा’च्या मुहूर्तावर आणि रविवारी अर्थात पहिल्या विकेंडला दोन्ही चित्रपटांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हे देखील वाचा – घरात होणार आज शिल्पा आणि अविनाशमध्ये राडा! सलमान कोणावर साधणार निशाणा
राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ चित्रपटाने चांगली सुरुवात केली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 5 कोटींची कमाई करून कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ आणि ‘मुंज्या’चा पहिल्या दिवसाच्या कमाईचा विक्रम मोडला आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, 2024 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मुंज्या’ने पहिल्या दिवशी 4.21 कोटी रुपयांची कमाई केली होती. चंदू चॅम्पियनने पहिल्या दिवशी 4.25 कोटींची कमाई केली होती. वीकेंडला चित्रपटाची कमाई वाढेल आणि तो उत्तम कलेक्शन करेल अशी आशा निर्मात्यांना आहे. ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’चे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. चित्रपटात राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्यासोबत मल्लिका शेरावत, राकेश बेदी, विजय राज, टिकू तलसानिया आणि अर्चना पूरण सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचं कथानत १९९७ मधील आहे.






