Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण होणार करोडपतीच्या मंचावर येणार ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर दुसऱ्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून आपल्या महाराष्ट्राची कन्या पद्मश्री सुधा मूर्ती सहभागी होणार आहेत. मागच्या आठवड्यात सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 16, 2022 | 03:09 PM
कोण होणार करोडपतीच्या मंचावर येणार ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर दुसऱ्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून आपल्या महाराष्ट्राची कन्या पद्मश्री सुधा मूर्ती सहभागी होणार आहेत. मागच्या आठवड्यात सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू झाले. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती उपस्थित राहणार आहेत. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.

‘साधी राहणी, उच्च विचार’ ही उक्ती तंतोतंत पाळणाऱ्या सुधा मूर्ती ‘कोण होणार करोडपती’च्या खेळात येत्या शनिवारच्या भागात सहभागी होणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या याही पर्वात दर आठवड्यातील शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुधा मूर्ती या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील ‘श्रीदेवी पावणा देवी कृपा शिक्षण विकास मंडळ’ या शाळेसाठी खेळल्या. शालेय शिक्षणाबद्दल असलेल्या आस्थेपोटी सुधा मूर्ती ‘कोण होणार करोडपती’ हा खेळ खेळल्या.

मूळच्या ‘कुलकर्णी’ असलेल्या सुधा मूर्तींचे बालपण कुरुंदवाड येथे गेले. त्यांचे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. त्यामुळे मराठी मातीशी घट्ट नाळ जोडलेली असल्याने सुधा मूर्ती यांना महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती यांबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे.

[read_also content=”समीर वानखेडेंच्या याचिकेवर दोन आठवड्यात उत्तर द्या, उच्च न्यायालयाचे जात पडताळणी समितीला निर्देश https://www.navarashtra.com/maharashtra/respond-to-sameer-wankhede-petition-within-two-weeks-high-court-293251.html”]

‘कोण होणार करोडपती’ या खेळासाठी सुधा मूर्ती यांनी खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातून भेट म्हणून मिळालेली, राजमातांनी दिलेली साडी परिधान केली आहे. लहानपणीच्या आठवणी, संस्कार, एकटी मुलगी म्हणून इंजिनिअरिंग करताना आलेले अनुभव, टाटा यांच्याबरोबर काम करत असतानाचा समृद्ध अनुभव अशा विविधांगी रंजक गोष्टींनी हा विशेष भाग रंगणार आहे.

[read_also content=”विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी शिवसेना ‘या’ हॉटेलमध्ये ठेवणार सर्व आमदारांना https://www.navarashtra.com/maharashtra/shiv-sena-will-keep-all-the-mlas-in-this-hotel-293286.html”]

सुधा मूर्ती या प्रस्थापित असून त्यांनी केलेले विस्थापितांसाठींचे कार्य गौरवास्पद आहे. पती नारायण मूर्ती यांच्याबरोबर ‘इन्फोसिस फाउंडेशन’ची धुरा पद्मश्री सुधा मूर्ती यांनी सक्षमपणे सांभाळली आहे. समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या सुधा मूर्ती यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्व ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर असणार आहे.

Web Title: Who will be the millionaire will come on the stage of senior writer and social worker sudha murthy nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2022 | 02:40 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • pune news
  • Sachin khedekar

संबंधित बातम्या

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?
1

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

ना इंडिकेटर, ना ब्रेक लॅम्प चालू! PMP ची दुरावस्था कधी संपणार? वाहनचालकांना कल्पना न आल्याने…
2

ना इंडिकेटर, ना ब्रेक लॅम्प चालू! PMP ची दुरावस्था कधी संपणार? वाहनचालकांना कल्पना न आल्याने…

PUNE NEWS : प्रभाग 25 मध्ये भाजपाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’: मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निश्चय
3

PUNE NEWS : प्रभाग 25 मध्ये भाजपाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’: मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निश्चय

Pune Election : “निवडणूक आता जनतेने….”, उमेदवार अमोल बालवडकर यांचे मोठे विधान
4

Pune Election : “निवडणूक आता जनतेने….”, उमेदवार अमोल बालवडकर यांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.