1. क्रेझी
२०२५ मध्ये कमी प्रेम मिळालेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे क्रेझी. हा चित्रपट एक माणूस आणि एक कार याभोवती फिरणारी हि थ्रिलर प्रेक्षकांच्या संयमाची आणि अभिनेत्याच्या क्षमतेची परीक्षा घेते. या चित्रपटात सोहम शाह यांची ताकदीची पण दुर्लक्षित भूमिका पाहायला मिळते. या चित्रपटाच्या गाण्याचे २०२५ मध्ये सर्वात कमी कौतुक झाले आहे. किशोर कुमार यांचा आवाजाचा नवा प्रयोग, ‘गोळी मार भेजे में’चे वेगळे सादरीकरण आणि गुलजार–विशाल भारद्वाज यांची जोडी यामुळे संगीत खास बनते. क्रिएटिव म्युझिक व्हिडिओ आणि वेगळ्या प्रमोशनमुळे क्रेझी एक संपूर्ण कलात्मक अनुभव देते.
इंद्रायणीला अधोक्षजपासून दूर करू शकेल का श्रीकला? लढाईत इंदूला मोठ्याबाईंची भक्कम साथ
2. होमबाउंड
२०२५ मधील सर्वात भावनिक चित्रपटांपैकी एक म्हणजे होमबाउंड आहे. नाती, आठवणी आणि “घर” या संकल्पनेचा अर्थ हा चित्रपट अतिशय साधेपणाने आणि संवेदनशीलतेने मांडतो. या चित्रपटात मोठे सीन किंवा गोंगाट नाही आहे. यात छोट्या-छोट्या भावना आणि प्रामाणिक अभिनय आहे जो हृदयाला भिडतो.
जिथे वर्षभर मोठ्या आणि भव्य चित्रपटांची चर्चा होती, तिथे होमबाउंड आपल्या साध्या पण प्रभावी नात्यांमुळे वेगळा ठरतो.
3. द डिप्लोमॅट
जॉन अब्राहम आणि सादिया ख़तीब यांचा द डिप्लोमॅट हा चित्रपट एक समजूतदार राजकीय थ्रिलर आहे. भारत–पाकिस्तान संबंधांना संतुलित आणि स्पष्ट पद्धतीने मांडणारा हा चित्रपट मोठ्या कूटनीतीसोबत वैयक्तिक संघर्षही दाखवतो. दमदार कथा आणि योग्य गतीमुळे हा 2025 मधील सर्वात सुबक थ्रिलरपैकी एक आहे. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि मजबूत प्रोडक्शन डिझाइनमुळे कथा जमिनीशी जोडलेली आहे. तरीही इतका दर्जेदार असूनही हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत फारसा पोहोचू शकला नाही आणि 2025 मधील एक दुर्लक्षित पण लक्षात राहणारा चित्रपट ठरला.
4. देवा
देवा हा सायकोलॉजिकल अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात शाहिद कपूर यांनी आपला दमदार अभिनय साकारला आहे. स्मृतीभ्रंशाचा त्रास असलेला एक पोलीस अधिकारी, जो स्वतःच्या सहकाऱ्याच्या हत्येचा तपास करतो—ही संकल्पना सस्पेन्स, भावना आणि तणाव यांचा चांगला समतोल साधते. गंभीर वातावरण, पात्रांची गुंतागुंत आणि सखोल टोन यामुळे देवा इतर मोठ्या चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतो. बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई न झाली तरी कथन आणि सादरीकरणाच्या दृष्टीने हा एक प्रभावी सिनेमॅटिक अनुभव देतो.
5. धडक 2
ओळखीच्या नावाला नवा दृष्टिकोन देत धडक 2 ने अपेक्षेपेक्षा वेगळा मार्ग निवडला. हा चित्रपट केवळ प्रेमकथेत अडकत नाही, तर समाजातील प्रश्नांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांची या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून जात, ओळख आणि व्यवस्थेतील भेदभाव असे मुद्दे प्रभावीपणे मांडले जातात. बॉक्स ऑफिसवर मर्यादित यश मिळाले असले तरी अभिनय प्रामाणिक आहे आणि कथा जमिनीशी जोडलेली वाटते. त्यामुळे धडक 2 ला जितकी दाद मिळायला हवी होती, तितकी मिळाली नाही.
6. Mrs.
प्रसिद्ध मल्याळम चित्रपट The Great Indian Kitchen चा हिंदी रिमेक असलेला Mrs. हा 2025 मधील सर्वात विचारप्रवर्तक OTT चित्रपटांपैकी एक ठरला. सान्या मल्होत्रा यांनी रिचा ही भूमिका साकारली असून, लग्नानंतर स्वतःची ओळख आणि स्वप्ने टिकवण्याचा तिचा संघर्ष या चित्रपटात प्रभावीपणे दिसतो. आरती कादव यांचे संवेदनशील दिग्दर्शन आणि सान्या मल्होत्रांचा संयत अभिनय चित्रपटाला खोल परिणाम देतो. कोणताही गोंगाट न करता Mrs. स्त्रीस्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि लिंगभेदावर ठाम भाष्य करतो.
7. आग्रा
आग्रा हा अतिशय निर्भीड चित्रपट असून नात्यांतील जवळीक, दडपलेल्या भावना आणि पुरुषत्वासारख्या मुद्द्यांवर थेट प्रकाश टाकतो. छोट्या शहराच्या पार्श्वभूमीवर तयार झालेली ही कथा समाजातील दुर्लक्षित विषय उघड करते. प्रामाणिक अभिनय, धाडसी कथन आणि गंभीर वातावरणामुळे आग्रा मुख्य प्रवाहातील चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतो. त्यामुळे हा 2025 मधील एक आवश्यक पण कमी चर्चेत आलेला चित्रपट बनतो.
राजकुमार हिरानींच्या ‘पीके’ला ११ वर्षे पूर्ण; Sanjay Duttच्या भैरों सिंह भूमिकेची BTS झलक समोर
Ans: छावा, धुरंधर, वॉर 2, कांतारा-चॅप्टर 1 हे चित्रपट सर्वाधिक चर्चेत होते.
Ans: क्रेझी, होमबाउंड, द डिप्लोमॅट, देवा, Mrs., आग्रा आणि धडक 2.
Ans: कमी प्रमोशन, मोठ्या चित्रपटांची स्पर्धा आणि मर्यादित स्क्रीन यामुळे हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत.






