आता गणेस उत्सवाच्या पाठोपाठ नवरात्री उत्सव देखील काही दिवसानांवर येऊन ठेपला आहे. यांच शारदीय नवरात्री, शक्तीच्या उपासनेचा सण, २६ सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ रोजी संपेल. नवरात्रीमध्ये भक्त दररोज दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. देवीची नऊ रूपे नऊ रंगांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे. यामुळेच नवरात्रीत ९ दिवस भाविक वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतात.
२६ सप्टेंबर २०२२, सोमवार – नवरात्रीचा रंग – पांढरा, नवरात्रीचा पहिला दिवस – पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे. पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो.
२७ सप्टेंबर २०२२, मंगळवार – नवरात्रीचा रंग – लाल, नवरात्रीचा दुसरा दिवस – लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
२९ सप्टेंबर २०२२, गुरुवार – नवरात्रीचा रंग – पिवळा, नवरात्रीचा चौथा दिवस – हा रंग उष्णतेचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो.
३० सप्टेंबर २०२२, शुक्रवार – नवरात्रीचा रंग – हिरवा, नवरात्रीचा पाचवा दिवस – शुक्रवारी हिरवा रंग वापरून देवीला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा. हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो.
१ ऑक्टोबर २०२२, शनिवार – नवरात्रीचा रंग – करडा, नवरात्रीचा सहावा दिवस – राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो.
२ ऑक्टोबर २०२२, रविवार – नवरात्रीचा रंग – केशरी, नवरात्रीचा सातवा – हा रंग सकारात्मक ऊर्जेने मूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो.
३ ऑक्टोबर २०२२, सोमवार – नवरात्रीचा रंग – मोरपंखी हिरव्या, नवरात्रीचा आठवा दिवस – निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्याने दोन्ही रंगांच्या गुणांचा फायदा होतो.
४ ऑक्टोबर २०२२, मंगळवार – नवरात्रीचा रंग – गुलाबी, नवरात्रीचा नववा दिवस – गुलाबी रंग सार्वत्रिक प्रेम, आपुलकी आणि आंनदाचे प्रतीक आहे.