मधुमेह हा एक सामान्य पण गंभीर आजार आहे, जो हळूहळू शरीराला पूर्णपणे कमकुवत करतो. मधुमेहाची लक्षणे शरीरात दिसून येतात, जसे की लघवीशी संबंधित समस्या, भूक लागणे, थकवा, वजन कमी होणे इत्यादी. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, त्याची काही लक्षणे रात्रीच्या वेळीही आपल्याला दिसतात. ही लक्षणे नेमकी कोणती आहेत याबाबत आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी अधिक विस्तारीत सांगितले आहे. आपण या लेखातून त्याची माहिती घेऊया (फोटो सौजन्य - iStock)
डायबिटीस हा असा आजार आहे जो एकदा तुमच्या मागे लागला की त्यापासून सुटका मिळत नाही. तुम्हाला याची लक्षणेही रात्रीही दिसून येऊ शकतात
जर तुम्हाला झोपल्यानंतर आणि रात्री लघवी केल्यानंतरही वारंवार उठून लघवी करावी लागत असेल, तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. जेव्हा शरीरातील साखरेची पातळी खूप जास्त होते तेव्हा मूत्रपिंड ते फिल्टर करण्यासाठी अधिक मेहनत घेते. अशा परिस्थितीत, लघवी पुन्हा पुन्हा सुरू होते
जर तुम्हाला रात्री झोपताना अचानक घाम येऊ लागला, अस्वस्थ वाटत असेल किंवा चिंताग्रस्ततेमुळे जागे व्हावे लागले तर हे कमी साखरेचे लक्षण असू शकते. अशावेळी तुमची साखर तपासा आणि डॉक्टरांशी संपर्क साधा
पायांमध्ये जळजळ किंवा मुंग्या येणे हेदेखील मधुमेहाचे लक्षण असू शकते. मधुमेहाचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो, ज्यामुळे रात्री झोपताना पायांमध्ये जळजळ, मुंग्या येणे किंवा बधीरपणा येऊ शकतो
मधुमेहामुळे झोपेची समस्या देखील उद्भवू शकते. रक्तातील साखर शरीराला आतून त्रास देते, ज्यामुळे तणावाच्या तक्रारी देखील उद्भवू शकतात. यामुळे दीर्घकाळ झोप येत नाही
डायबिटीसची ही लक्षणे तुम्हाला रात्रीच्या वेळेत जाणवत असतील तर तुम्ही त्वरीत तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून औषधं घ्यायला सुरूवात करा