संस्कृतीने नटलेला शहर तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मान्यता असलेले आपले पुणे येथील सण उत्सवांसाठी नेहमीच चर्चेत असते. राज्यात सार्वजनिक गणेश उत्सव साजरे करण्याची पद्धत या शहरातूनच उदयास आली. चला तर मग जाणून घेऊयात, पुण्याच्या 5 मानाच्या गणपतीबद्दल:
हे आहेत पुण्याचे मानाचे ५ गणपती. (फोटो सौजन्य- Social Media)
पुण्याचा ग्रामदैवत मानला जाणारा कसबा गणपती हा पुण्याचा पहिला मानाचा गणपती आहे. कसबा गणपतीला गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये पहिला मान दिला जातो.
पुण्यातील दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती. हा गणपती तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिरात विराजमान असतो आणि भक्तांची मोठी गर्दी येथे होते.
पुण्यातील गुरुजी तालीम गणपती शहरातील तिसरा मानाचा गणपती आहे. हे गणपती पुणेकरांचे श्रद्धास्थान आहे.
तुळशीबाग गणपती मोठ्या आकाराचा असून चौथा मानाचा गणपती आहे. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
लोकमान्य टिळकांनी येथूनच सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली होती. एतिहासिकदृष्ट्या महत्वाचा असणारा हा गणपती पुण्यातील पाचवा मानाचा गणपती आहे.