फोटो सौजन्य - X (Proteas Men)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेची लाईव्ह स्ट्रिमिंग : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये काही दिवसाआधी तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 2-1 असे पराभुत केले. आता या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा आज होणार आहे. टी20 मालिकेचे दक्षिण आफ्रिका संघाचे एडन मार्करमने केले होते तर ऑस्ट्रेलियाच्या संघाचे मिचेल मार्शने नेतृत्व केले होते.
मागील सामन्यांमध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसने कमालीची कामगिरी केली होती. त्याने शतक त्याचबरोबर २ अर्धशतक देखील झळकावले होते. त्याला एकदिवसीय मालिकेमध्ये देखील खेळण्याची संधी मिळाली आहे. केशव महाराज, वियान मुल्डर याचे देखील संघामध्ये पुनरागमन होणार आहे, त्यामुळे आता त्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.
It’s the opening clash of what promises to be an enthralling ODI series as our Proteas take on Australia! 🔥🏏
A rivalry steeped in history in a contest fueled by passion. Don’t miss a single moment of the action. 💚💛
Catch it all live on SuperSport! 🖥#WozaNawe pic.twitter.com/K4nQOMB2LU
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 18, 2025
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करेल. दुसरीकडे, टी-२० विजयानंतर मिचेल मार्श एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करत राहील. ही मालिका मंगळवारपासून सुरू होत आहे. चला तर मग जाणून घेऊया पहिला एकदिवसीय सामना कधी आणि कुठे खेळला जाईल. तसेच, तुम्ही भारतात टीव्ही आणि मोबाईलवर हा सामना कसा पाहू शकता.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी १० वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी होईल. या सामन्याचे आयोजन केर्न्स येथील केझलीज स्टेडियमवर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. पहिल्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅपवर पाहता येईल.
Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, अॅडम झांपा.
टेम्बा बावुमा (कर्णधार), कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रीट्झके,डेवाल्ड ब्रेव्हिस, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, एडेन मार्कराम, सेनुरन मुथुसामी, केशव महाराज, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, लुआन-ड्रे प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, प्रेनेलन सुब्रायन.