सर्वच महिलांच्या कपाटात वेगवेगळ्या रंगाच्या, बॉर्डरच्या आणि पारंपरिक पद्धतीने विणकाम करण्यात आलेल्या साड्या असतात. त्यातील सर्वच महिलांच्या आवडीची साडी म्हणजे चंदेरी सिल्क साडी. ही साडी महिलांच्या सौंदर्यासाठी आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा लग्न समारंभात महिला चंदेरी सिल्क साडी आवडीने नेसतात. मात्र बऱ्याचदा साडी नेसल्यानंतर ती योग्य पद्धतीने ठेवली जात नाही. यामुळे साडीचे धागे, रेशीम खराब होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आज आम्ही तुम्हाला चंदेरी सिल्क साडी ठेवण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये कपाटात साडी ठेवल्यास ती कधीच खराब होणार नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
वर्षानुवर्षे नव्या सारखी राहील चंदेरी सिल्क साडी!
चंदेरी सिल्क साड्या नेहमीच हाताने धुवाव्यात. कधीही मशीनचा वापर करू नये. मशीनच्या वापरामुळे साडीचे मऊ धागे निघून येण्याची जास्त शक्यता असते. साडी धुवताना पाण्याचे तापमान सामान्य ठेवा. जास्त गरम पाण्याचा वापर करू नये.
चंदेरी सिल्क साड्या कपाटात ठेवण्याआधी व्यवस्थित कोरड्या करून ठेवाव्यात. तसेच, कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी नॅप्थालीन बॉल्सऐवजी कडुलिंबाची पाने वापरावीत.
साडीला इस्त्री करताना नेहमीच सामान्य तापमानात इस्त्री करावी. अन्यथा साडीची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. गरम इस्त्री थेट कापडावर लावू नका.
शमी कापडावर थेट परफ्यूम किंवा डिओडोरंट लावल्याने साडीला डाग पडण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय साडी नेसण्याआधी साडीवर परफ्यूम लावावा आणि काहीवेळ साडी सुकू द्यावी.
साडीवर डाग किंवा बुरशी यांची तपासणी कारवी. साडी बराच काळ कपाटात ठेवली असेल तर खेळत्या हवेत अधूनमधून बाहेर काढून ठेवावी. यामुळे साडीला वास येणार नाही.