उपाशी पोटी नियमित एक सागरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील 'हे' मोठे बदल
दैनंदिन आहारात फळांचे सेवन करण्याचा सल्ला घरातील मोठे कायमच देतात. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात, असे सुद्धा म्हंटले जाते. पूर्वीच्या काळातील लोक कायमच निरोगी आणि उत्साही होती. कारण सकाळी लवकर उठणे, पोटभर नाश्ता, आहार, पौष्टिक पदार्थांचे सेवन, भरपूर पाण्याचे सेवन आणि योग्य जीवनशैली जगत असल्यामुळे त्यांना कोणत्याही आजारांची लागण व्हायची नाही. मात्र हल्लीच्या काळात लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहेत. आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्याऐवजी जंक फूड, तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यवर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे कायमच हेल्दी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक सफरचंद खावे.(फोटो सौजन्य – istock)
जीवनशैलीतील चुकीच्या सवयी आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे कायमच पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या अन्नपदार्थांचे आहारात सेवन करावे. दिवसाची सुरुवात हेल्दी पदार्थानी करावी. सफरचंद खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. लाल रंगाचे नाजूक फळ शरीराला भरपूर ऊर्जा देते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नियमित एक सफरचंद खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कामासोबतच शरीराकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. सफरचंदमध्ये भरपूर फायबर आढळून येते. डॉक्टरसुद्धा आहारात कायमच फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. फायबरयुक्त पदार्थ खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांच्या हालचाली सुलभ होतात. महिनाभर नियमित सकाळी उठून उपाशी पोटी एक सफरचंद खाल्ल्यास पोट स्वच्छ होण्यासोबतच आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल.
वाढलेले वजन कमी करताना आहारात वेगवेगळ्या पेयांचे किंवा पदार्थांचे सेवन केले जाते. पण त्याऐवजी सकाळी उठून उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. यामध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे अनहेल्दी खाण्याच्या क्रेव्हिंग्स कमी होतात. महिनाभर नियमित एक सफरचंद खाल्यास पोटाचा वाढलेला घेर कमी होईल.
नियमित एक सफरचंद खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी राहते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक करून टाकते, ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते.या सर्वच समस्यांपासून कायम लांब राहण्यासाठी सफरचंद खावे.
धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचा खूप जास्त खूप जास्त टॅन होऊन जाते. त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो वाढवण्यासाठी नियमित एक सफरचंद खावे. यामध्ये विटामिन सी आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि चेहरा सुंदर दिसतो.
सफरचंद खाण्याचे फायदे:
सफरचंदात असलेले फायबर आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि नियमित शौचास मदत करते. रोज सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
सफरचंद खाण्याची योग्य पद्धत:
सफरचंदाच्या सालीसकट खाल्ल्याने ते अधिक फायदेशीर ठरते, कारण सालातही अनेक पोषक तत्वे असतात. रोज सकाळी उपाशीपोटी सफरचंद खाणे फायदेशीर मानले जाते.