गायक अभिजीत सावंत त्यांच्या गाण्यांनी नेहमीच धुमाकूळ घालत असतो. अभिजित सावंतसाठी प्रेक्षकांच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे. दिवाळीच्या या सणात त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मग ती पहिली अंघोळ असो वा दिवाळी पाडवा! आज त्याने भाऊबीज साजिरी केली आहे.
अभिजीत सावंतने साजरी केली भाऊबीज. (फोटो सौजन्य - Social Media)
गायक अभिजित सावंतने त्याच्या बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली आहे. त्याच्या बहिणीचे नाव सोनाली आहे.
या क्षणांमध्ये अभिजीत डोक्यावर मराठमोळी टोपी घालून बसला आहे तर त्याची बहिण त्याला ओवाळत आहे.
अभिजीतने हे क्षण त्याच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केला आहे. तसेच सगळ्यांना या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
कॅप्शनमध्ये दोघे भाऊ बहिणींना शुभेच्छा तसेच शुभार्शिवाद देण्यात आल्या आहेत. तसेच भरभरून दिवाळीच्या शुभेच्छा आल्या आहेत.
मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांनी त्यांच्या भाऊबीजेचा खास सण चाहत्यांशी शेअर केला आहे.