अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी 'शेवंता'! रात्रीस खेळ चाले या मालिकेतून राज्यातील घराघरात पोहचलेली आणि खासकरून तरुणांच्या मनात एक स्पेशल कॉर्नर निर्माण करणारी अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी जोडलेली असते. अशात तिच्या नव्या पोस्टने तर धुमाकूळच केली आहे.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने छान फोटोज शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने तिच्या @apurvanemlekarofficial या इंस्टाग्राम हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने सफेद रंगाचा लुक केला आहे. या आऊटफिटमध्ये असे वाटत आहे की अभिनेत्री जणू स्वर्गाची सुंदर अप्सरा आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'A princess in a dress, but a queen at heart; I am beautifully imperfect, a canvas filled with scars.' असे नमूद केले आहे. तसेच या Look बद्दल माहिती दिली आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये तरुणाईने गर्दी केली आहे. 'प्रिन्सेस, स्वर्गातली अप्सरा चुकून धरतीवर पोहचली की काय...?' असे अनेक सुंदर कॉमेंट्स पाहायला मिळत आहेत.
तिच्या सुंदर हसण्याने या Photos ला आणखीन खास रूप दिले आहे. तिचे हसणे या photos चे प्रमुख आकर्षण ठरले आहे.