युरिक अॅसिडचे क्रिस्टल्स सांध्यामध्ये जमा होतात ज्यामुळे समस्यांना तोंड द्यावे लागते. जर तुम्हाला युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असेल तर या डाळी खाणे टाळा. जास्त प्युरिन असलेल्या या डाळींचे सेवन करणे टाळावे. अन्यथा, त्या खाल्ल्याने तुमची युरिक अॅसिडची समस्या आणखी वाढू शकते. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याबाबत अधिक माहिती सांगितली आहे. तुम्हीही जाणून घ्या कोणत्या आहेत या ‘डाळी’, ज्या तुमच्या आरोग्यासाठी ठरतील कर्दनकाळ (फोटो सौजन्य - iStock)
हाय युरिक अॅसिडची समस्या असेल तर काही डाळींचे सेवन करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कोणत्या आहेत या डाळी जाणून घ्या
मसूरमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. पण ते युरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी फायदेशीर नाही, त्यामुळे युरिक अॅसिड वाढू शकते
चण्याच्या डाळीमध्ये प्रथिने आणि प्युरिनचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे युरिक अॅसिड तयार होते. त्यामुळे युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असलेल्या रुग्णांनी चण्याची डाळ खाणे टाळावे
जास्त युरिक अॅसिड असलेल्या रुग्णाने राजमा खाऊ नये. राजमा तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढवू शकते
काळ्या उडीद डाळीमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे युरिक अॅसिड तयार होते. त्यामुळे सांधेदुखी आणि सूज वाढते त्यामुळे सहसा काळी उडीद डाळ खाणे टाळा
तूरडाळ खाल्ल्याने युरिक अॅसिड, संधिवात आणि सांधेदुखी वाढू शकते. या डाळींमुळे युरिक अॅसिडचे प्रमाण वाढण्याची समस्या वाढू शकते. हे सर्व टाळणे चांगले