रशीद खान(फोटो-सोशल मीडिया)
Rashid Khan’s unwanted record : अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खान सद्या एका वेगळ्याचे गोष्टीने चर्चेत आला आहे. द हंड्रेड लीगमध्ये त्याने एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली आहे. या स्पर्धेत रशीद खानची ही सर्वात खराब कामगिरी ठरली आहे. त्याने २० चेंडूत ५९ तब्बल धावा मोजल्या आहेत. द हंड्रेडच्या इतिहासातील ही सर्वात लाजिरवाणी कामगिरी ठरली आहे.
इंग्लंड आणि बर्मिंगहॅम फिनिक्सचा मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने मंगळवारी द हंड्रेडमध्ये ओव्हल इनव्हिन्सिबल्सच्या रशीद खानची चांगलीच धुलाई केली. लिव्हिंगस्टोनने रशीद खानच्या पाच चेंडूत सलग तीन षटकार खेचले आणि त्यानंतर दोन चौकार देखील लगावले. रशीद खानने ओव्हल इनव्हिन्सिबल्सच्या ७६ व्या ते ८० व्या चेंडू दरम्यान २६ धावा दिल्या.
रशीद खानने २० चेंडूत ५९ धावा मोजल्या खऱ्या पण या दरम्यान त्याला एक देखील विकेट घेता आलेली नाही. हंड्रेडच्या इतिहासामधील २० चेंडूत ही सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे. रशीद खानचा हा सर्वात महागडा टी-२० स्पेल देखील ठरला आहे, (आकडेवारीनुसार हंड्रेडला टी-२० मानले जाते). लिव्हिंगस्टोनला रशीद खानचा चांगला समाचार घेतला. त्याच्या शानदार फलंदाजीने बर्मिंगहॅम फिनिक्सने सामना आपलया खिशात टाकला. लिव्हिंगस्टोन २७ चेंडूत ६९ धावा करत नाबाद राहिला. परिणामी फिनिक्सने ९८ चेंडूत चार विकेट्सने सामना आपल्या नावावर केला.
यासोबतच लिव्हिंगस्टोन हा रशीद खानविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये २०० पेक्षा जास्त धावा फटकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. लिव्हिंगस्टोनला टी-२० क्रिकेट या फॉरमॅटचा सर्वोत्तम खेळाडू मानले जाते. त्याच वेळी, इतर कोणताही खेळाडूला रशीद खानविरुद्ध १५० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही.
२०२३ च्या विश्वचषकानंतर रशीद खानच्या पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा फॉर्म आणि सातत्य कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्याला देखील या गोष्टीची जाणीव आहे. त्याने अलीकडेच ही बाब कबूल केली आहे. बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात तो ५५ षटके टाकण्यासाठी परतला तेव्हा असे घडले होते.
रशीद म्हणाला की, “टी-२० सामन्यांमध्ये सर्व काही ठीक असते कारण तो कमी षटकांचा खेळ असतो. तुम्ही स्वतःला सांभाळून घेऊ शकता. पण कसोटी क्रिकेटसारख्या दीर्घ स्वरूपासाठी, मला थोडी वाट पाहण्याचा सल्ला दिला गेला आहे. कारण मी पूर्णपणे तयार नव्हतो. मी यापूर्वीही घाईघाईत असाच निर्णय घेतला होता कारण तेव्हा संघाला माझी गरज होती. त्यावेळी आम्ही कसोटी सामन्यात पराभूत होत होतो. म्हणून मी लवकर मैदानात परतलो. नंतर मला वाटले की ही माझी चूक आहे. कारण माझे शरीर त्यासाठी पूर्णपणे तयार झाले नव्हते आणि मला दुखापतीचा त्रास देखील होऊ लागला होता. जेव्हा तुमची पाठ कडक असते तेव्हा तुम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने मैदानात चांगल्या लयीत खेळू शकत नाही.”