बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तर नुकतीच 'आयफा अवॉर्ड्स 2024' बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या अवॉर्ड्स सोहळयाला अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.आयफा अवॉर्ड्समध्ये जान्हवी कपूरने घातलेल्या गोल्डन ड्रेसची आणि तिच्या नेकल्सची जोरदार चर्चा आहे. जान्हवीने परिधान केलेल्या नेकलेसची किंमत 8 कोटी रुपये एवढी आहे. तसेच तिने या अवॉर्ड्स फॅक्शनसाठी गोल्डन गाऊन परिधान केला होता. चला तर जाणून घेऊया जान्हवी कपूरच्या नेकल्सबद्दल कलाही खास.(फोटो सौजन्य-instagaram)
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या नेकलेसने वेधले साऱ्यांचे लक्ष
IIFA Award मध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने परिधान केलेल्या नेकलेसची किंमत ८ कोटी रुपये एवढी आहे.
जान्हवी कपूरने परिधान केलेल्या नेकलेसवर वेगवेगळ्या रंगांचे रंगीत डायमंड आहेत. हिरव्या, गुलाबी आणि जांभळ्या अश्या तीन रंगाच्या नाजूक डायमंडमुळे नेकलेस सुंदर आणि उठावदार दिसत आहे.
जान्हवी कपूरने आयफा अवॉर्डसाठी गोल्डन कलरचा गाऊन परिधान केला होता. स्ट्रॅपलेस प्लंगिंग नेकलाइन असलेल्या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होतो.
जान्हवीने कौटरियर गौरव गुप्ता यांनी डिझाइन केलेला कस्टम मेड गाऊन परिधान करून आयफा अवॉर्ड्स २०२४ मध्ये हजेरी लावली होती.
जग प्रसिद्ध अमी पटेल यांनी स्टाईल केलेला Bvlgari नेकलेस परिधान करून जान्हवी अवॉर्ड सोहळ्यासाठी हजर राहिली होती. जान्हवीच्या नेकलेसवर हिरे आणि रत्न आहेत.