Rinku Rajguru: आर्ची अर्थात रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे साडी लुक्स तर चाहत्यांना कमालीचे आवडतात. दिवाळीच्या दिवशीही रिंकूने आपला मराठमोळा साज जपत निळ्या रंगाची नऊवारी पैठणी नेसून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रिंकूने यावर्षीच्या दिवाळीला खासच साज केल्याचे दिसून येत आहे. रिंकूचा हा लुक तुम्ही अगदी कोणत्याही सणाला कॅरी करू शकता. भाऊबीजेसाठीही तुम्ही असा नऊवारी साडी लुक करून भावाला ओवाळू शकता. पाहा कसा आहे रिंकूचा झक्कास तोरा! (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रिंकूने या दिवाळीसाठी खास निळ्या रंगाच्या नऊवारी पैठणी साडीचा लुक केल्याचे दिसून आले आहे. तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत असून रिंकू या साडीत अत्यंत साजिरी गोजिरी दिसतेय आणि तिचा हा लुक पाहतच राहण्यासारखा आहे
काठापदराची निळ्या रंगाची अगदी पारंपरिक नऊवारी पैठणी रिंकूने नेसली आहे आणि तिने अगदी मराठमोळा पारंपरिक साजही या दिवाळीसाठी केलाय. अगदी ऐटीत पोझ देत तिने तिचा हा लुक शेअर केलाय. एखाद्या जुन्या महाराणीसारखीच रिंकू दिसत आहे
रिंकूने दिवाळी साजरी करताना हातात फुलबाजी फुलवली आहे आणि साडीचा साज पूर्ण करताना तिने हेअरस्टाईल म्हणून अगदी छानसा अंबाडा घातला आहे आणि त्यामध्ये मोगऱ्याची वेणी घालायला ती विसरलेली नाही. तिचा हा मनमोहक नखरा सर्वांनाच आवडतोय
रिंकूने या पारंपरिक नऊवारी पैठणी साडीसह पारंपरिक सोन्याचे दागिने मॅच केले आहेत. नेकलेस आणि मोठा नेकलेस असे दागिने घालून त्यासह मॅच होणारे झुमके आणि बुगडीही तिने घातले आहेत आणि मराठमोळ्या साडीचा हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने नाकात नथ घालून हा साज पूर्ण केलाय
रिंकूने या साडीसह टिपिकल गावातील काचेच्या बांगड्या मॅच केल्या आहेत. तिचा हा लुक परफेक्ट दिसत असून भाऊबीजेसाठीही अगदी योग्य आहे. तुम्हीही कोणता लुक करायचा असा विचार करत असाल तर रिंकूच्या या नऊवारी पैठणी साडीच्या लुकवरून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता
रिंकूने यासह सटल मेकअप करत डार्क आयब्रो, आयलायनर, काजळ, हायलायटर आणि डार्क लिपस्टिक लावली आहे आणि कपाळावर नाजूकशी चंद्रकोर लावत तिने आपला हा मराठमोळा लुक पूर्ण केलाय. चाहत्यांनी तर तिच्या फोटोंवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत