सर्वच महिला सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी ब्लाऊजला वेगवेगळ्या डिझाईन शिवून घेतात. पैठणी, सिल्क, डिझायनर किंवा स्टायलिश साडी खरेदी केल्यानंतर त्यावर हटके आणि उठावदार लुक दिसण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेतले जातात. ब्लाऊजला नवीन टच देण्यासाठी लटकन, पॅचेस लावून घेतले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लेटेस्ट डिझाईनचे लटकन, पॅचेसचे काही आकर्षक डिझाईन सांगणार आहोत. या डिझाईन ब्लाऊजची शोभा वाढवतील. (फोटो सौजन्य: Pinterest)
सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजला लावा 'या' सुंदर-स्टायलिश डिझाईनचे लटकन
बाजारात १०० रुपयांपासून ते अगदी ३००० ते ४००० हजार रुपये किमतींपर्यंत लटकन उपलब्ध आहेत. त्यामुळे साडीवरील लुक आणखीनच खुलून दिसण्यासाठी या डिझाईनचे लटकन तुम्ही वापरू शकता.
डिझायनर साडी किंवा ड्रेस खरेदी केल्यानंतर मागील गळ्याला तुम्ही रंगीत लटकन लावू शकता. यामधील मणी, रंगीत धागे तुमच्या लुकची शोभा वाढवतील.
डिझायनर साडीवर ब्लाऊज शिवताना मागील गळ्याला आरी वर्क किंवा स्टोन वर्क केलेले लटकन तुम्ही लावू शकता. आरी वर्क लटकन किमतीने महाग असतात.
हेवी लेहेंगा किंवा हेवी डिझाईनच्या साडीवर तुम्ही या पद्धतीने वर्क करून तयार केलेले लटकन लावून घेऊ शकता. हे लटकन अतिशय सुंदर दिसतात.
काहींना अतिशय साधे ब्लाऊज हवे असतात. अशावेळी तुम्ही या डिझाईनचे लटकन लावून घेऊ शकता. बारीक मण्यांचे लटकन अतिशय सुंदर दिसतात.