भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. कारण भारतामध्ये जेवणाच्या ताटात प्रामुख्याने भात हा पदार्थ खाल्ला जातो. भात खाल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. तुम्ही आतापर्यंत सगळीकडे पांढऱ्या आणि लाल रंगाचा उकडीचा तांदूळ पहिला असेल पण कधी काळ्या रंगाचा तांदूळ पाहिला आहे का? काळ्या रंगाचा तांदूळ आसाममध्ये पिकवला जातो. आसाममध्ये जेवणाच्या ताटात पांढऱ्या रंगाच्या भाताऐवजी काळ्या रंगाच्या भाताचे सेवन केले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काळ्या रंगाच्या तांदळाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
काळ्या तांदळाचे आश्चर्यकारक फायदे
काळ्या रंगाच्या तांदुळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँन्थोसायनिन इत्यादी घटक आढळून येतात. या तांदुळाचा आहारात समावेश केल्यामुळे शरीरातील घाण स्वच्छ होऊन शरीर निरोगी राहते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक काळ्या रंगाच्या तांदळाचा भात खातात. कारण यामध्ये चरबीचे प्रमाण कमी असते. काळ्या रंगाचा भात खाल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढत नाही.
यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि यकृत डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही आहारात काळ्या रंगाच्या तांदुळाचे सेवन करू शकता. 100 ग्रॅम काळ्या तांदळामध्ये साधारणतः 4.5 ग्रॅम फायबर आढळून येते.
हृद्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात काळ्या रंगाच्या तांदळाचे सेवन करा. ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होईल.
भारतीय बाजारपेठेत काळ्या तांदुळाची किंमत प्रति किलो 250 ते 300 रुपयांच्या आसपास आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी रोजच्या आहारात पांढऱ्या रंगाचा भात खाण्याऐवजी काळ्या रंगाच्या तांदुळाचे सेवन करावे.