हिंदू धर्मात वटपौर्णिमा सणाला विशेष महत्व आहे. यंदाच्या वर्षी २९ जूनला वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. विवाहित महिलांसाठी वटपौर्णिमा सण अतिशय महत्वाचा आहे. हा सण पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यानंतर झाडाला सात फेरे मारले जाते. प्रत्येक सणावारांच्या दिवसांमध्ये हातांवर मेहंदी काढली जाते. त्यामुळे येणाऱ्या वटपौर्णिमेला या डिझाईनची मेहंदी हातांवर नक्कीच काढा. (फोटो सौजन्य – pinterest)
हातांच्या सौंदर्यात भर घालवण्यासाठी वटपौर्णिमेला हातांवर काढा 'या' खास मेहंदी डिझाईन, दिसाल अधिक सुंदर

सणावारांच्या दिवसांमध्ये हातांवर मेहंदी काढणे अतिशय शुभ आणि अखंड सौभाग्य प्रतीक मानले जाते. त्यामुळे नवविवाहित स्त्रीने प्रत्येक सणाला हातांवर थोडीशी तरी मेहंदी काढावी.

वडाच्या झाडाची पाने आणि फांद्या असलेल्या डिझाईन्स खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे हातांवर तुम्ही या डिझाईनची आकर्षक मेहंदी काढू शकता

अनेकांना हातांवर हिना मेहंदी डिझाईन काढायला खूप जास्त आवडते. त्यामुळे हिनाची ही व्हायरल डिझाईन सणावारांच्या दिवसांमध्ये सुद्धा उठून दिसते.

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यामुळे हातांवर सुद्धा वडाचे झाड आणि इतर नाजूक डिझाईन काढून या पद्धतीने सुंदर मेहंदी काढू शकता.

कामाच्या धावपळीमध्ये मेहंदी काढण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी या डिझाईनची झटपट होणारी मेहंदी तुम्ही काढू शकता.






