Green Tea For Health: ग्रीन टी वजन कमी करणारे पेय म्हणून आजकाल जास्त ट्रेंडमध्ये आहे. याचे आरोग्यदायी फायदे आहेत यात काहीच शंका नाही मात्र ते जादुई नक्कीच नाही. ग्रीन टी पिण्याने चयापचय वाढविण्यास मदत होते, ज्यामुळे चरबी जाळण्याच्या प्रक्रियेस गती मिळते. पण यासाठी ते योग्य पद्धतीने पिणे महत्त्वाचे आहे. आहारतज्ज्ञ शिखा कुमारी यांनी तिच्या @dietitian_shikha_kumari या इन्स्टाग्राम हँडलवर ग्रीन टीसह संबंधित अशा चुका सांगितल्या आहेत ज्यामुळे त्याचे फायदे तोट्यात बदलतात. तुम्ही ही चूक तर करत नाही ना याची खात्री हे वाचून नक्की करून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
ग्रीन टी पिण्याचे अनेक फायदे आहेत हे नक्की, मात्र चुकीच्या पद्धतीने ग्रीन टी पित असाल तर वेळीच व्हा सावध आणि त्याच्या तोट्याची माहिती करून घ्या

ग्रीन टीमध्ये टॅनिन असतात जे पोटाची आम्लता वाढवू शकतात, ज्यामुळे पोटात अस्वस्थता किंवा मळमळ होऊ शकते. पचनाची कोणतीही समस्या टाळण्यासाठी, तज्ज्ञ ग्रीन टी पिण्यापूर्वी काहीतरी खाण्याची शिफारस करतात

ग्रीन टीचे अनेक आरोग्य फायदे असले तरी जास्त प्रमाणात प्यायल्याने अनिद्रा, चिंता आणि पचनाच्या समस्यांसारखे नकारात्मक परिणाम शरीरावर होऊ शकतात. दररोज 2-3 कप ग्रीन टी पिणे सुरक्षित मानले जाते

ग्रीन टीमध्ये कॅफिन असते, त्यामुळे झोपेच्या वेळी प्यायल्यास तुमच्या झोपेत बाधा येऊ शकते. झोपण्याच्या किमान 2-3 तास आधी ग्रीन टी पिणे टाळा

जेवणानंतर ताबडतोब ग्रीन टी प्यायल्याने अन्नातून लोह शोषण्यात व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे कालांतराने ॲनिमिया होऊ शकतो. जेवणानंतर 1 तासाने ग्रीन टी प्यावा

उकळत्या पाण्यात ग्रीन टी घातल्याने त्यातील फायदेशीर संयुगे नष्ट होऊ शकतात, ज्यामुळे त्याची चव कडू होते. सुमारे 80-85 अंश सेल्सिअस पाण्यात ग्रीन टी बनवा

काही औषधं चालू असतील तर त्यावर ग्रीन टी पिण्याने त्रास होऊ शकतो. यामध्ये रक्त पातळ करणारी औषधे, नैराश्यासाठी औषधे आणि उच्च रक्तदाबाचा समावेश आहे. तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर ग्रीन टी घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

ग्रीन टी बॅग पुन्हा वापरू नका. प्रत्येक वेळी ग्रीन टी बनवताना ताजी चहाची पाने किंवा नवीन चहाची पिशवी वापरा. याचे अधिक फायदे आरोग्याला मिळतील






