NCP ने खासगी रुग्णालयाबाहेर लावले बॅनर
रुग्णालयांनी ही लूट थांबवावी, नागरिकांनी अशा परिस्थितीत आमच्याकडे संपर्क करावा अशा आशयाचे आवाहन करणारे बॅनर्स अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी शहरात केली आहे. सर्व रुग्णालयांबाहेर याविषयी फलक लावले असून, तक्रारी आल्यास आंदोलन करण्याचा इशाराही भगत यांनी दिला आहे. खासगी रुग्णांलयांमध्ये अनेकदा रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेत असल्याची तक्रार प्रत्येकजण करत असतो आणि यात बऱ्यापैकी तथ्यदेखील आहे. इतकंच नाही तर अनेकदा रुग्णांकडे लक्षही दिले जात नाही. पैसे भरल्यानंतरच उपचार सुरू केले जातात. या गोष्टीला आळा बसण्याची गरज आहे. रुग्णांचे प्राण महत्त्वाचे आहेत हे लक्षात घेऊनच NCP ने हे पाऊल उचलले आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
रुग्णांना लुबाडू नका, कर्माची फळे येथेच भोगायची आहेत, अशा आशयाचा मजकूर या फलकांवर लिहिला आहे. खासगी रुग्णालयाबाहेरील हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. खासगी रुग्णालयांच्या बिल आकारण्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. मनमानीपणे बिल वसूल केले जात आहे अशा आशय असलेले बॅनर्स सर्वत्र झळकवण्यात आले आहेत.
चॅरिटीच्या नावाखाली भूखंड घेऊन प्रत्यक्षात सर्वसामान्य रुग्णांना त्याचा लाभ मिळवून दिला जात नाही. चॅरिटी सुविधांचा माहिती फलक लावण्यात येत नाही. रुग्णालयांनी लुबाडणूक थांबविली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. रुग्णालयाबाहेर लावलेल्या फलकांवरील मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक रुग्णालयांची धर्मादाय अंतर्गत नोंद झाली आहेत. त्यांनी शासनाच्या सुविधाही घेतल्या आहेत. याठिकाणी गरजूंवर मोफत उपचार करणे आवश्यक आहे.उपचारांची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी फलकावर लावण्यात आलेली नाही. आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणीही होत आहे.
खासगी रुग्णालयांत बिल आकारण्यावर नियंत्रण नाही. लाखो रुपये बिल घेतले जात आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने सर्वसामान्यांची लुबाडणूक थांबवावी, यासाठी सर्व ठिकाणी फलक लावले आहेत. त्यावर पालिका देखील कारवाई करत नसून, छुप्या पद्धतीने सर्व सुरू आहे. नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांना न्याय मिळवून देऊ वेळ पडल्यास आंदोलनही करू – नामदेव भगत, जिल्हाध्यक्ष, अजित पवार गट






