सकाळी उठल्यानंतर अतिशय आवडीने अनेक लोक ग्रीन टी चे सेवन करतात. ग्रीन टी च्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. अँटीऑक्सिडंट्स, कॅटेचिन आणि पॉलीफेनॉल इत्यादी घटकांनी समृद्ध असलेली ग्रीन टी शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. पण वारंवार ग्रीन टी चे सेवन करणे धोक्याचे ठरू शकते. ग्रीन टी सगळ्यांच्या आरोग्यासाठी सुर्लक्षित नाही. आज आम्ही तुम्हाला ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
आवडीने green tea चे सेवन करत असाल तर थांबा! आरोग्याला पोहचेल गंभीर हानी

गर्भवती महिलांनी ग्रीन टी चे सेवन अजिबात करू नये. कारण यामध्ये असलेले कॅफिन आणि टॅनिन, गर्भधारणेदरम्यान फॉलिक ऍसिडचे शोषण करून घेते. अतिप्रमाणात ग्रीन टी चे सेवन केल्यास अकाली प्रसूती किंवा कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याची जास्त शक्यता असते.

स्तनपान करण्याऱ्या महिलांनी ग्रीन टी चे सेवन करणे टाळावे. कारण यामध्ये असलेले कॅफिन आईच्या दुधात मिक्स झाल्यामुळे बाळाला निद्रानाश , चिडचिड आणि पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास ग्रीन टी पिऊ नये. यामुळे शरीरात अशक्तपणा किंवा थकवा जाणवू लागतो. आहारात लोहयुक्त पदार्थांचे आणि पेयांचे सेवन करावे.

आम्लता, गॅस, मळमळ आणि छातीत जळजळ इत्यादी पचनाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात अजिबात ग्रीन टी चे सेवन करू नये. यामुळे ऍसिडिटी वाढते.

ग्रीन टी मध्ये असलेल्या कॅफिनचा परिणाम रक्तदाब किंवा हृद्यासंबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे ग्रीन टी पिऊ नये.






