सूर्यफुलाच्या बिया वजन नियंत्रणासाठी फायदेशीर असतात. या बियांच्या सेवनाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. फक्त लठ्ठपणा नव्हे तर त्वचेसाठी ही फार फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये जीवनसत्त्व E आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला उजळ व निरोगी ठेवण्यास मदत करतात. ही माहिती संशोधनावर आधारित आहेत.
कोणतीही गोष्ट आहारात समाविष्ट करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (फोटो सौजन्य - Social Media)

सूर्यफुलाच्या बियांमध्ये फायबर आणि हेल्दी फॅट असते, जे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करते.

सूर्यफुलाच्या बियांचे सेवन हाडे मजबूत करतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम असते, जे हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे.

या बिया वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. या बियांमध्ये प्रथिनं आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, जे लवकर पोट भरल्याची भावना निर्माण करते आणि जास्त खाण्याची सवय कमी होते.

सूर्यफुलाच्या बियांमध्ये ओमेगा-6 फॅटी Acids आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतात.






