सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वच महिलांना छान नटून थटून तयार व्हायला खूप आवडत. महिला आणि मुली घरी कोणता कार्यक्रम किंवा लग्न समारंभात छान साडी नेसून जातात. तर काहींना नऊवारी साडी नेसायला खूप आवडते. साडी नेसल्यानंतर हल्ली अनेक महिला पूर्वीच्या काळातील जुने दागिने घालून छान तयार होतात. फॅशनच्या युगात हल्ली पारंपरिक दागिन्यांची मोठी क्रेझ वाढली आहे. पूर्वीच्या काळातील पारंपरिक दागिने हल्ली नव्या रूपात बाजारात आले आहेत. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा दागिना म्हणजे बुगडी. बुगडी घालत्यानंतर कान पूर्ण भरलेले दिसतात. या दागिन्यामुळे कानाची शोभा वाढते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बुगड्यांच्या काही नवीन डिझाइन्सबदल सांगणार आहोत. या डिझाइन्स नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
पारंपरिक बुगड्या डिझाइन्स
बुगडी घाल्यानंतर कानाचे सौदंर्य आणखीन वाढते. तसेच मागील अनेक वर्षांपासून सणासुदीच्या दिवसांमध्ये महिला कानात बुगडी, झुमके इतर वेगवेगळ्या पद्धतीचे कानातले घालत होत्या.
लग्नसराईच्या निमित्ताने लेटेस्ट फॅशनची बुगडी तुम्हाला घ्याची असेल तर तुम्ही या पद्धतीची बुगडी घेऊ शकता. मोत्याची बुगडी सर्वच महिलांना खूप आवडते.
काहींना कानाच्या वरती कान टोचायला आवडत नाही. अशांसाठी सुद्धा बाजारात बुगड्या उपलब्ध आहेत. या पद्धतीच्या बुगड्या घालून तुम्ही पुन्हा कडून ठेवू शकता.
फॅशनच्या युगात हल्ली बाजारात चांदीच्या बुगड्या सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. रोजच्या वापरात जर तुम्हाला काही सिंपल आणि सुंदर डिझाइन्स हवी असेल तर तुम्ही या पद्धतीच्या बुगड्या बनवू शकता.
ट्रॅडिशनल मराठी लूक केल्यानंतर जर तुम्हाला हेवी बुगड्या हव्या असतील तर तुम्ही या पद्धतीच्या बुगड्या परिधान करू शकता. या बुगड्या मोती, सोनं, चांदीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.