'त्रिदेव' चित्रपटातील 'तिरची टोपी वाले' या गाण्यातून ९०च्या दशकात रातोरात स्टार बनलेली सोनम खान प्रदीर्घ काळानंतर तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. 'ग्लॅमरस गर्ल' म्हणून चर्चेत राहिलेली अभिनेत्री सोनम खान तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
Sonam Khan Dress
९०च्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलं आहे. 'ग्लॅमरस गर्ल' म्हणून चर्चेत राहिलेली अभिनेत्री सोनम खान तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री सोनम खान कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत स्टायलिश अंदाजात फोटोशूट करत असते. ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक समजली जाणारी सोनम तिच्या स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.
१९८८ मध्ये आलेल्या 'विजय' चित्रपटातून सोनमने फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केले. पहिल्याच चित्रपटात अभिनेत्रीने अनेक बोल्ड आणि किसिंग सीन दिले होते. सोनमच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या फॅशनचे चाहते चांगलेच कौतुक करीत आहेत.
स्टायलिश ब्लॅक ड्रेस, ग्लॉसी मेकअप, डार्क लिपस्टिक आणि सिंपल हेअरस्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधले. सोनम खानच्या ह्या ग्लॅमरस अदांवर प्रेक्षकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सोनम खानच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव करण्यात आला असून कमेंट्सचाही वर्षाव करण्यात आला आहे.