सध्या इंडस्ट्रीसह सर्वत्र लग्नाचा सीझन सुरू आहे. जनसामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटी सध्या लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळत आहे. आता अशातच आणखी एका सेलिब्रिटीने गुपचूप लग्न उरकलं आहे. 'ॲस्पिरेंट्स' फेम अभिनेत्याने आज गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्याने फोटो शेअर करत चाहत्यांना लग्न केल्याची माहिती दिली आहे.
Naveen Kasturia Wedding Pics
सध्या इंडस्ट्रीसह सर्वत्र लग्नाचा सीझन सुरू आहे. जनसामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटी सध्या लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळत आहे. आता अशातच आणखी एका सेलिब्रिटीने गुपचूप लग्न उरकलं आहे.
गुपचूप लग्नबंधनात अडकलेल्या सेलिब्रिटीचं नाव नवीन कस्तुरिया आहे. 'ॲस्पिरेंट्स' फेम नवीन कस्तुरियाने आज गुपचूप लग्नबंधनात अडकला आहे. अभिनेत्याने फोटो शेअर करत चाहत्यांना लग्न केल्याची माहिती दिली आहे.
प्रसिद्ध अभिनेता नवीन कस्तुरियाने वयाच्या ३९ व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्याची पत्नी इंडस्ट्रीतील नाही. "चट मंगनी पट ब्याह..." असं कॅप्शन देत पत्नीबरोबर सप्तपदी घेताना आणि भांगात कुंकू भरतानाचे लग्नातील अविस्मरणीय क्षण शेअर केले आहेत.
अभिनेत्याने या खास सोहळ्यावेळी शेरवानी, फेटा असा खास लूक केला होता. तर त्याच्या पत्नीने भरजरी लेहेंगा परिधान करत दागिन्यांनी साज केला होता.
नवीन कस्तुरिया बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता असून त्याने अनेक लोकप्रिय चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे. झी ५ वर रिलीज झालेल्या 'मिथ्या' सीरीजमुळे अभिनेता चर्चेत आहे.