सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पामध्ये संसदेची नवीन त्रिकोणी इमारत, केंद्रीय सचिवालय, तीन किलोमीटरच्या राजपथाचं पुनरुज्जीवन, पंतप्रधानांचं नवीन निवासस्थान, कार्यालय आणि उपराष्ट्रपतींचं नवीन एन्क्लेव्ह यांचा समावेश आहे.
सेंट्रल व्हिस्टाला भेट देणाऱ्या हजारो पर्यंटकांच्या सुविधेसाठी येथे 400 अधिक बाकांची सोय करण्यात आली आहे.
चहूबाजूंनी हिरवेगार असलेले लाल ग्रॅनाइट वॉकवे, वेंडिंग झोन, पार्किंग लॉट्स आणि चोवीस तास सुरक्षा असणार आहे.
राजपथलगत असलेल्या परिसरात राज्यनिहाय खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ही लावण्यात येणार आहे.
1 हजार 125 वाहनांसाठी पार्किंगची जागा निश्चित करण्यात आली असून इंडिया गेटजवळ 35 बसेससाठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी सेंट्रल प्रकल्पाचा 8 सप्टेंबरला संध्याकाळी उद्घाटन होणार आहे.