चमकदार आणि निरोगी केसांसाठी सतत काहींना काही केले जाते. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी आहारात बदल करून केसांची काळजी घेतली जाते. केसांच्या वाढीसाठी कायमच महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांचा वापर करून बनवलेल्या वेगवेगळ्या हर्बल पेयांचा समावेश आहारात करावा. यामुळे केसांसोबतच त्वचेला सुद्धा आवश्यक पोषण मिळते आणि केस मजबूत होण्यास मदत होते. ग्रीन टी, हिबिस्कस टी, रोजहिप टी, कॅमोमाइल टी आणि पेपरमिंट टी यांसारख्या पेयांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य कायमच निरोगी राहील. (फोटो सौजन्य – istock)
केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी नियमित करा 'या' हर्बल पेयांचे सेवन

सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा प्यायला जातो. पण उपाशी पोटी चहा पिण्याऐवजी हर्बल पेयांचे सेवन करावे. यामुळे थकवा कमी होतो आणि मूड फ्रेश होण्यास मदत होते.

संतुलित आहार आणि योग्य स्किन-हेअर केअरसह आहारात वेगवेगळ्या हर्बल पेयांचे सेवन करावे. तुळशीची पाने, काळीमिरी आणि आल्याचा वापर करून बनवलेले पेय त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.

रोजच्या आहारात हर्बल पेयांचा समावेश केल्यास कायमच आनंदी आणि उत्साही राहाल. वारंवार पचनाच्या समस्या उद्भवू लागल्यास अँटीऑक्सिडंट्स आणि इतर वनस्पतीजन्य घटकांनी समृद्ध असलेल्या पेयांचे सेवन करावे.

धावपळीनंतर शरीरात वाढलेला थकवा कमी करण्यासाठी कॅमोमाइल टी खूप लोकप्रिय आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे वनस्पतीजन्य घटक असतात. यामुळे थकवा कमी होण्यासोबतच त्वचा आणि केसांना सुद्धा फायदे होतात.

त्वचेसाठी ग्रीन टी खूप जास्त फायदेशीर आहे. ग्रीन टी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि त्वचा, केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.






