शरीर कायम निरोगी आणि हेल्दी ठेवण्यासाठी आहारात प्रथिनांचे सेवन करणे आवश्यक आहे. प्रथिने मिळवण्यासाठी बऱ्याचदा आहारात मासे, चिकन, मटण, अंडी इत्यादी मांसाहारी पदार्थांचे सेवन केले जाते. शरीरात प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यानंतर स्नायू कमकुवत होणे, केस गळणे, त्वचेच्या समस्या इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून निघेल. (फोटो सौजन्य – iStock)
शरीरात निर्माण झालेली प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' शाहाकरी पदार्थांचे सेवन
रोजच्या आहारत मसूर आणि बीन्स इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात प्रथिने मिळतात. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही मसूर, राजमा, हरभरा, डाळींचे सेवन करू शकता.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर, टोफू खायला खूप आवडते. त्यामुळे प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात तुम्ही पनीर किंवा टोफू खाऊ शकता.
राजगिरा आणि क्विनोआ हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. याशिवाय यात फायबर, कार्ब्स, लोह आणि इतर पोषक घटक आढळून येतात.
बदाम, अक्रोड, चिया बियाणे, भोपळ्याच्या बिया, अळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही नियमित या पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता दूर होईल.
दैनंदिन आहारात सर्व भाज्यांचे नियमित सेवन करावे. पालक, ब्रोकोली किंवा इतर पालेभाज्या, फळभाज्यांमध्ये भरपूर प्रथिने आढळून येतात.