(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
टॉलिवूड स्टार वरुण तेज आणि त्यांची पत्नी लावण्या त्रिपाठी यांनी त्यांच्या मुलाचा नामकरण सोहळा साजरा केला. या जोडप्याने त्यांच्या मुलाचे नाव हनुमान ठेवले, जे हनुमानाचे समानार्थी शब्द आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसह ही बातमी शेअर केली आणि हे नाव उघड केले आहे. या जोडप्याने त्यांच्या मुलाला काय ठेवले आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
कोनिडेला कुटुंबात केले वायु तेजचे स्वागत
आज, विजयादशमीनिमित्त, वरुण तेज आणि लावण्याने त्यांच्या मुलाचे नाव ‘वायुव’ असे ठेवले आहे. अशा प्रकारे, कोनिडेला कुटुंबात वायुव तेज कोनिडेला यांचे स्वागत करण्यात आले आहे. वरुण तेज आणि लावण्या यांनी ही बातमी त्यांच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवर शेअर केली. या जोडप्याने एका गोंडस व्हिडिओसह दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये वरुण आणि लावण्या वायुववर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सगळे चाहते आणि कलाकार वायुवचे स्वागत करत आहेत.
जोडप्याने दाखवली बाळाची झलक
वरुण आणि लावण्याने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ हनुमानाच्या प्रतिमेने आणि हनुमान चालीसातील श्लोकांनी सुरू होतो. व्हिडिओ नंतर नाव निवडीमागील कारण स्पष्ट दिसत आहे. “अजेय शक्ती, भक्ती, धैर्य आणि आध्यात्मिक तेजाचे प्रतीक असलेले नाव. भगवान हनुमानाच्या आत्म्याचे मूर्त स्वरूप धारण करून, आम्ही आमचा मुलगा, वायुव तेज कोनिडेला, यांची ओळख करून देतो.” असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?
वरुण आणि लावण्या त्यांच्या मुलावर प्रेमाचा वर्षाव
या व्हिडिओ व्यतिरिक्त, या जोडप्याने दोन फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये ते त्यांच्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. नामकरण समारंभात लावण्याने सोनेरी नारंगी साडी परिधान केली आहे, तर वरुण तेजने ऑफ वाईट कुर्ता घातला होता. फोटोंमध्ये ते त्यांच्या मुलासोबत खेळताना दिसत आहेत. या दोघांचे सुंदर फोटो पाहून चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.
वरुण आणि लावण्याच्ये २०२३ मध्ये लग्न
वरुण तेज आणि लावण्याने १ नोव्हेंबर २०२३ रोजी इटलीमध्ये लग्न केले. गेल्या महिन्यात १० सप्टेंबर रोजी त्यांनी त्यांच्या मुलाचे स्वागत केले. वरुण आणि लावण्या यांची भेट “मिस्टर” या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर झाली. मैत्रीनंतर ते प्रेमात पडले आणि पाच वर्षांहून अधिक काळ त्यांचे नाते खाजगी ठेवले. नंतर त्यांनी लग्न करून चाहत्यांना चकीत केले.