WhatsApp वर आपल्याला दिवसभरात अनेक मेसेज येतात. आपण काही मेसेज न बघता फॉरवर्ड करतो. सहसा सणांच्या काळात हे मोठ्या प्रमाणात घडतं. तुम्ही देखील असंच करता का? मात्र अशावेळी जर तुम्ही कोणता चुकीचा कंटेट शेअर केला तर तुम्हाला शिक्षा भोगावी लागू शकते. कारण असं करणं कायद्याने गुन्हा आहे, आणि यासाठी तुम्हाला तुरुंगात देखील जावे लागू शकते. आता आम्ही तुम्हाला अशाच मेसेजबद्दल सांगणार आहोत, जे WhatsApp वर पाठवल्यास शिक्षा होऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
फॉरवर्ड करण्याआधी नक्की वाचा! दिवाळीत WhatsApp वर हे मेसेज पाठवलात तर थेट जेल! सावध रहा
आयटी कायदा आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) चे अनेक कलम यानुसार अनुचित किंवा आक्षेपार्ह संदेश पाठवणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते.
लोक अनेकदा प्रौढांसाठी व्हिडिओ, फोटो किंवा विनोद गंमत म्हणून किंवा मस्करीसाठी ग्रुप्समध्ये पाठवतात. तथापि, जर एखाद्या सदस्याने यावर आक्षेप घेतला कलम ६७ अंतर्गत दंड आकारला जाऊ शकतो.
देशविरोधी कंटेट असलेली एखादी पोस्ट शेअर केल्यास तुरुंगवासाची शिक्षा होण्याची देखील शक्यता असते.
मुलांशी संबंधित हिंसाचार दर्शविणारे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ किंवा कंटेंट शेअर करणे हे POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा आहे.
मारामारीचे, हिंसाचाराचे किंवा एमएमएस व्हिडिओ WhatsApp वर शेअर करणं आयटी कायद्याच्या कलम 66A आणि 153A अंतर्गत गुन्हा आहे.