तुम्ही कधी चालताना किंवा गाडीतून जाताना रस्त्यावर असणाऱ्या रेषांचे निरीक्षण केले आहे का? त्या पट्ट्या का असतील? या रेषा पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या का असतात? कधी ते सरळ रेषेत असतात तर कधी तुकड्यांमध्ये का असतात? तुम्ही विचार करत असाल की या ओळी रस्त्याचे दोन भाग करण्यासाठी आहेत, तर तुम्ही अगदी बरोबर आहात. मात्र हे फक्त रस्त्याचे दोन भाग करण्यापुरते नाही तर त्याचे इतरही अर्थ आहेत, जे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. (फोटो सौजन्य: iStock)
रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांसाठीही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून चालताना तुमची सुरक्षितता लक्षात घेऊन रस्त्यावरील पिवळे आणि पांढरे पट्टे लक्षात घेऊन त्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
ही पांढरी पट्टी म्हणजे तुम्ही ज्या लेनमध्ये तुमचे वाहन चालवत आहात त्याच लेनमध्ये जावे. तुम्ही समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करून दुसऱ्या लेनमध्ये जाऊ शकत नाही.
या पट्टीचा अर्थ असा होतो की तुम्ही इतर वाहनांना ओव्हरटेक करू शकता, पण पिवळ्या पट्टीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तेलंगणामध्ये अशा प्रकारच्या पट्ट्या आढळतात.
तुटलेली पांढरी व पिवळी पट्टी रस्त्याच्या मधोमध असली, तर समजून घ्या की तुम्ही ओव्हरटेक करू शकता, परंतु सावधगिरीने इतर वाहनांना धडक न देता.
या पट्ट्या म्हणजे जोपर्यंत कोणता अडथळा येत नाही तोपर्यंत तुम्ही ज्या लेनमध्ये आहात त्याच लेनमध्ये तुम्ही गाडी चालवावी. तुम्हाला दुसऱ्या लेनवर जाता येणार नाही.
जर तुम्हाला रस्त्याच्या कडेला सतत पिवळी पट्टी दिसली, तर ही पट्टी सूचित करते की रस्त्याच्या कडेला कोणतेही वाहन उभे करण्यास परवानगी नाही.
तुटलेली पांढरी पट्टी सरळ पांढऱ्या पट्टीत बदलताना दिसली तर समजून घ्या की सरळ पांढरी पट्टीचे पुन्हा तुकडे होत नाहीत तोपर्यंत तुम्ही लेन बदलू शकत नाही.