लग्न समारंभ , सणवार, घरातील कार्यक्रमाच्या वेळी महिला मुली साडी नेसताना.साडी नेसल्यानंतर केसांमध्ये आवजून मोगऱ्याचा किंवा अबोलीच्या फुलांचा गजरा माळला जातो. केसांमध्ये गजरा घातल्यानंतर केसांची शोभा वाढते. याशिवाय कार्यक्रमात तुमचा लुक अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतो. सुंदर पैठणी किंवा सिल्कची साडी नेसल्यानंतर केसांमध्ये सुंदर गजरा घातला जातो. म्हणूनच आज आम्ही सणावाराच्या दिवसांमध्ये साडी नेसल्यानंतर केसांमध्ये कशा पद्धतीने गजरा घालावा, याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुमचा हेअर स्टाईल करण्याचा वेळही वाचेल आणि तुम्ही सुंदर दिसाल. (फोटो सौजन्य – pinterest)
केसांमध्ये 'या' पद्धतीने माळा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा, ५ मिनिटांमध्ये करा साधीसोपी हेअरस्टाईल
साडी नेसल्यानंतर अनेकांना केसांची वेणी घालायला खूप आवडते. त्यामुळे वेणी घातल्यानंतर तुम्ही या पद्धतीने केसांच्या भोवती गजरा गुंडाळाल्यास तुमचे केस सुंदर दिसतील.
महिंलाची सगळ्यात आवडती हेअरस्टाईल म्हणजे अंबोडा. साडी नेसल्यानंतर कमीत कमी वेळात हेअर स्टाईल करायची असल्यास तुम्ही अंबोडा घालून त्यावर ३ किंवा ४ गजरे घालू शकता.
अनेक महिला भरपूर गजरे घालायला खूप आवडतात. त्यामुळे केस मोकळे सोडून त्यावर तुम्ही तुम्हाला हवे तितके गजरे घालू शकता. यामुळे तुमचा लुक सुंदर दिसेल.
लहान केसांची हेअर स्टाईल काय करावी बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही आडव्या पद्धतीमध्ये दोन गजरे केसांमध्ये घालू शकता. यामुळे तुम्हाला हेअर स्टाईल करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
लहान केसांची वेणी घातल्यानंतर केसांमध्ये जास्त गजरा न माळता तुम्ही या पद्धतीने गजरा घालू शकता. वेणीच्या वरच्या बाजूला गजरा लावल्यास केस सुंदर दिसतील.