सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खा 'ही' हिरवी पाने
पोटातील गॅस, आम्लता आणि बद्धकोष्ठतेच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पेरू किंवा पेरूची पाने खावीत. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक पेरू खाल्ल्यास पोट स्वच्छ होण्यास मदत होईल.
रक्तात वाढ्लेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पेरूची पाने खावीत. बऱ्याचदा शरीरात मधुमेह वाढ्लेल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. मात्र वारंवार दुर्लक्ष केल्यास इतर अवयवांना इजा पोहचण्याची जास्त शक्यता असते.
पेरूच्या पानांमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे रोगांसोबत लढण्याची क्षमता वाढते. सर्दी खोकला किंवा संसर्ग जाण्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी पेरूची पाने खावीत.
पेरूच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे हिरड्यांमध्ये वाढलेले इन्फेक्शन कमी होते आणि आराम मिळतो. तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी करण्यासाठी पेरूची पाने खावीत.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पेरूची पाने चावून खावीत. हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी पेरू खावेत.