कॉलिंग, चॅटिंग, मेसेजिंग, फोटोग्राफी, इंटरनेट ब्राउजिंग या सर्व कामांसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. स्मार्टफोन सध्याच्या काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये बँक डिटेल्स, पर्सनल फोटो, डॉक्युमेंट्स आणि पर्सनल चॅट्स सारखी संवेदनशील माहिती असते. अशावेळी आपल्या फोनची सुरक्षा आपल्यासाठी महत्त्वाची असते. याच सुरक्षेसाठी स्मार्टफोनच्या सिक्योरिटी लॉकचा वापर केला जातो. (फोटो सौजन्य – Pinterest)
Smartphone Lock: फिंगरप्रिंट, फेस अनलॉक की पासकोड! कोण देतं जास्त सुरक्षा? जाणून घ्या
सिक्योरिटी लॉकसाठी स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट, फेस अनलॉक आणि पासकोड असे विविध ऑप्शन्स आहेत. पण यातील सर्वात सुरक्षित पद्धत तुम्हाला माहिती आहे का?
फिंगरप्रिंट स्कॅनिंग जलद होते आणि त्याचा वापर करणं देखील सोपं आहे. बहुतेक स्मार्टफोनमध्ये ही सुविधा दिली जाते. पण तुमचे हात खराब असतील किंवा ओले असतील तर अशा परिस्थितीत फिंगरप्रिंट स्कॅनिंग योग्य प्रकारे काम करत नाही.
फेस अनलॉकमध्ये फोनला हात न लावता तो अनलॉक करता येतो. ही पद्धत कोवीडपूर्वी लोकप्रिय होती. मात्र मास्क आणि चश्मा यांमुळे फेस अनलॉक योग्य प्रकारे काम करत नव्हता.
जर तुमच्या फोनमध्ये (आयफोनप्रमाणे) 3D फेस स्कॅनिंग असेल, तर ही पद्धत अधिक सुरक्षित आणि खूप विश्वासार्ह आहे. परंतु केवळ कॅमेरा-आधारित 2D स्कॅनिंगमुळे फसवणूक होण्याची शक्यता असते.
पासकोड किंवा पिन सर्वच स्मार्टफोनमध्ये असतो. ही एक मजबूत सुरक्षा मानली जाते. बायोमेट्रिक सिस्टम फेल झाल्यानंतरही पासकोड किंवा पिन काम करते. जर तुम्ही 6-अंकी किंवा अल्फान्यूमेरिक (अक्षरे + संख्या) पासवर्ड निवडला तर तो सर्वात मजबूत सुरक्षा प्रदान करतो.
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसाठी मजबूत पासकोडसह फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक अशी सुरक्षा पद्धत निवडू शकता. तुमचा पासकोड वारंवार बदला आणि असा कोड निवडा जो कोणीही सहज अंदाज लावू शकणार नाही.