जम्मू-काश्मीरमधील खोऱ्यातील वरच्या भागात शुक्रवारी (दि. 15 नोव्हेंबर ) पुन्हा एकदा बर्फवृष्टी आणि पाऊस सुरू झाला आहे. तर सखल भागात पावसासह दिवसभर आकाश दाट ढगाळ राहिले.
First snowfall of this season in Kashmir Beautiful pictures appeared
जम्मू-काश्मीरमधील खोऱ्यातील वरच्या भागात शुक्रवारी पुन्हा एकदा बर्फवृष्टी आणि पाऊस सुरू झाला आहे. तर सखल भागात पावसासह दिवसभर आकाश दाट ढगाळ राहिले.
जम्मू-काश्मीरमध्ये हवामानाची स्थिती बिघडली आहे. शुक्रवारी घाटीच्या वरच्या भागात पुन्हा एकदा बर्फवृष्टी आणि पाऊस सुरू झाला आहे. तर श्रीनगरसह सखल भागात दिवसभर पावसाने आभाळ दाटून ठेवले होते.
आज, काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्याच्या उत्तरेस असलेल्या माछिलच्या संपूर्ण भागात नवीन हिमवृष्टी झाली आहे. पहाटे उत्तर काश्मीरच्या वरच्या भागात सांदा ते माछिल, वाडी बुंगे या भागात बर्फवृष्टी सुरू झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बर्फवृष्टी आणि पावसामुळे बांदीपोरा-गुरेझ आणि मुगल रोडवरील वाहतूक बंद झाली होती, तर तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे.
यासोबतच पुढील २४ तासांत खोऱ्यातील वरच्या भागात बर्फवृष्टी आणि पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे सोमवारी हवामानात बदल झाला आणि अफ्रावत, गुरेझ, तुलाई, सोनमर्ग, मुगल रोडसह बहुतेक उंच पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाली. तर गेल्या महिन्यात खोऱ्यात कोरडे हवामान होते आणि पावसात 75 टक्क्यांहून अधिक घट झाली होती.