हल्ली दुकानात जाऊन स्मार्टफोन खरेदी करण्यापेक्षा लोकं ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईटवरून स्मार्टफोनची खरेदी करतात. यामध्ये अनेक फायदे असतात. पहिलं म्हणजे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुकानात जाण्याची गरज नसते आणि दुसरं म्हणजे डिस्काऊंट आणि ऑफर्ससह तुम्ही कमी किंमतीत स्मार्टफोनची खरेदी करू शकता. ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करण्याचे फायदे आहेतच पण त्यासोबतच नुकसान देखील आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: ई-कॉमर्स वेबसाईटवरून करताय स्मार्टफोनची खरेदी? या महत्त्वाच्या टीप्स नेहमी लक्षात ठेवा
मोठ्या सवलती, एक्सचेंज ऑफर आणि बँक सवलती पाहून आपण ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करतो. हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते.
ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी केलेला स्वस्त फोन चांगला असेलच असं नाही. फोनचे स्पेसिफिकेशन, ब्रँडचा विश्वास आणि परफॉर्मंस देखील महत्त्वाचं आहे.
बऱ्याचदा कंपन्या विक्रीदरम्यान जुने किंवा बंद झालेले मॉडेल मोठ्या डिस्काऊंटसह विकतात. असे फोन खरेदी करणे टाळा.
लोक बऱ्याचदा सेल्समध्ये असे फोन खरेदी करतात ज्यामध्ये भरपूर फीचर्स असतात, पण या फीचर्सचा वापर कधीच केला जात नाही. म्हणून तुमच्या गरजांनुसार फोनची खरेदी करा.
बऱ्याचदा एक्सचेंज ऑफरमध्ये दाखवण्यात येणारी किंमत खरी नसते. त्यामुळे तुमचा जुना फोन एक्सचेंज करण्यापूर्वी त्याची योग्य किंमत जाणून घ्या.
सेलमधून फोन खरेदी करताना लक्षात ठेवण्याची शेवटची गोष्ट म्हणजे कोणताही फोन खरेदी करण्यापूर्वी, यूजर रिव्यू, व्हिडिओ रिव्यू आणि रेटिंग्ज नक्कीच तपासा.