छत्रपती संभाजीनगर: छत्रपटो संभाजीनगर शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात गजबजलेल्या रेल्वे उडाणपुलाखाली थरकाप उडवणारी घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याचे सावर आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या मृतकाचे नाव इमरान शेख असे आहे. तो रिक्षाचालक म्हणून काम करतो. हा तरुण बुधवारी रात्री संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली थांबला होता. त्यावेळी कारमधून आलेल्या दोन अज्ञातांनी त्याला गाठलं. हातातील धारदार कोयत्याने वार करत त्याच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आणि जागेवरच कोसळला. हल्ला केल्यानंतर आरोपी कराडहून पसार झाले. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
स्थानिकांनी घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी परिसराची पाहणी केली आणि पंचनामा केला. पुढील तपासणीसाठी मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे. यात सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. हत्या नेमकी कश्यामुळे झाली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे .पुढील तपास पोलीस करत आहेत.
मेकअप आर्टिस्टवर भररस्त्यात प्राणघातक हल्ला
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कदायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी एका मेकअप आर्टिस्टवर रस्त्यातच जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे. ही घटना शहरातील उद्धवराव पाटील चौकात 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली आहे. जुन्या वादाने हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.
हा हल्ला संजीत संजित संजय थोरात (वय 24, रा. भारतमातानगर, एन-12) यांच्यावर झाल्याचे समोर आले आहे. ते व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहेत. हल्ला झालेल्या दिवशी थोरात हे आपल्या दुचाकीचे पंक्चर काढण्यासाठी उद्धवराव पाटील चौकात गेले होते. त्याचवेळी शेखर पोतदार (वय 34, रा. बी सेक्टर, टीव्ही सेंटर) व प्रज्वल राजपूत (वय 25) हे दोघे तेथे आले. जुन्या भांडणाचा विषय काढून त्यांनी थोरात यांना अडवले व शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.
पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर