Ganesh Chaturthi 2025 : आज आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. संपूर्ण भारतात भक्तिच, आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणेशोत्सवाची सुरुवात होते ते दहा दिवस हा उत्सव चालतो. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या लाडक्या बाप्पाला म्हणजेच विघ्नहर्ता, बुद्धीचे दाता आणि यशाचे अधिष्ठता यांना इतर देशांमध्येही पुजले जाते. त्यांची भक्ती केली जाते. या देशांमध्ये गेणशोत्सव अतिशय खास पद्धतीने साजरा केला जातो. आज आपण या देशांबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये थायलंड, जपान, इंडोनेशिया, श्रीलंका आणि भारताचा शेजारी देश नेपाळचा समावेश आहे.
Ganesh Chaturthi celebration in other countries
थायलंड थायलंडमध्ये गणेश भगवान यांना फ्रा-फिकानेत किंवा फ्रा-फिकानेसुआन या नावाने ओळखले जाते. येथे १०व्या शकतानमध्ये गणपती बप्पाची कांस्य मूर्ती फांग-ना या शहरामध्ये सापजली होती. तसेछ थायलंडमधील चातोएंगसाओ या शहराला गणेश भगवंताचे शहर म्हणून मानले जाते. भारप्रमाणेच येथे बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून यशाचे अधिष्ठता म्हणून ओळखले जाते. येथील मूर्ती ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. याची लांबी ३९ मीटर आहे
नेपाळ : भारताच्या शेजारी देश नेपाळमध्येही गणपती बप्पाची अनेक भव्य मंदिरे आहेत. नेपाळची राजधानी काठमांडूच्या खोऱ्यामध्ये कमलादी गणेश मंदिर सर्वात लोकप्रिय आहे. येथे भगवान गणेशजींना पांढरे गणेश म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मंगळवारी गणेशाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. दर मंगळवारी मोठ्या संख्येने येथे भाविकांची गर्दी होते. नेपाळमध्येही बप्पाला बुद्ध, यश आणि समृद्धीचे प्रतीक मानतात
इंडोनेशिया - इंडोनेशियाच्या जावा बेटावर भगवान गणेशाची तांत्रिक देवता म्हणून अर्चना केली जाते. ही परंपरा १४ व्या शकतापासून सुरु झाली. येथे पूर्वी २० हजार रुपयांच्या नोटेवर गणेशजींचे चित्र होते. तसेच येथील मूर्ती ही ७०० वर्षे जूनी आहे, जी जावामधील माउंट ब्रोमोजवळ आहे. येथे गणपती बप्पाला श्रद्धेचे आणि इतिहासेचे प्रतीक मानतात
श्रीलंका-श्रीलंकेत गणेश भगवान यांना पिल्लयार म्हणून ओळखले जाते. विशेष करुन तामिळ बहुल भागामध्ये त्यांची पूजा केली जाते. श्रीलंकेमध्ये गणेश भगवान यांची १४ प्राचीन मंदिरे आहे. तसचे कोलंबोजवळ केलन्या गंगा नदीच्या काठावरही अनेक बौद्ध मंदिरांमध्ये गणेश भगवंताच्या मूर्ती स्थापित आहेत. येथेही गणपती बप्पाला विघ्नहर्ता मानले जाते
जपान - जपानमध्ये गणेश बप्पाला कांगितेन नावाने ओळखले जाते. पौराणिक कथानुसान ८ व्या शतकामध्ये भारतातून गणपती बप्पा जपानमध्ये नेण्यात आले. येथे गणपती बप्पाला सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते