सर्वच लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत सगळेच चमचमीत पदार्थ खायला हवे असतात. नाश्त्यात नेहमीच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण लहान मुलांच्या आरोग्यासाठी सतत तेलकट तिखट पदार्थ खाणे गुणकारी नाही. त्यामुळे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कायमच गुणकारी आणि पौष्टिक पदार्थ खाण्यास द्यावे. आज आम्ही तुम्हाला लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कोणते पदार्थ खाण्यास द्यावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात द्या 'हे' निरोगी आणि चविष्ट पदार्थ
सकाळच्या नाश्त्यात मुलांना पोहे खाण्यास द्यावे. कारण पोहे सहज पचन होतात. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, लोह आणि फायबर इत्यादी आवश्यक घटक आढळून येतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास शरीराला ऊर्जा मिळेल.
नेहमीच तांदळाच्या मिश्रणाची इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही ओट्स इडली बनवू शकता. हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी सुद्धा खाल्ला जातो. ओट्स खाल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि लवकर भूक लागत नाही.
मैद्याच्या पिठाचा वापर न करता लहान मुलांना मल्टीग्रेन पीठ वापरून पराठा बनवून द्यावा. वेगवेगळ्या भाज्या आणि पनीर टाकून बनवलेला पराठा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे.
सकाळच्या नाश्त्यात कायमच एक तरी फळ खावे. वेगवेगळी फळे आणि दही मिक्स करून खाल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहील, ज्यामुळे मुलं कायमच निरोगी राहतील.
मोड आलेले कडधान्य शरीरासाठी प्रभावी ठरतात. यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. कडधान्य खाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.