२०२६ या नवीन वर्षात येणारा पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी सर्वच महिला काळ्या रंगाची साडी नेसून सण साजरा करतात. घरातील देवांची पूजा करून सुगड पुजले जाते. त्यानंतर महिलांना घरी बोलावून हळदीकुंक सुद्धा दिले जाते. मकर संक्रांती सणाला काळ्या रंगाच्या साडीला विशेष महत्व आहे. ही साडी केवळ परंपरा म्हणून नाहीतर फॅशन म्हणून सुद्धा नेसली जाते. अनेक वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये पैठणी साडी उपलब्ध आहेत. त्यामुळे मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगची सुंदर पैठणी खरेदी करू शकता. पहा या आकर्षक पैठणी डिझाईन. (फोटो सौजन्य – pinterest)
मकर संक्रांतीनिमित्त खरेदी करा काळ्या रंगाची सुंदर पैठणी

पैठणी साडीवर करण्यात आलेले मोराचे नक्षीकाम साडीची शोभा वाढवतात. यासोबतच मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने परिधान करण्याची प्रथा आहे.

काळ्या रंगाच्या साडीला सोनेरी रंगाचा काठ खुलून दिसतो. साडीमध्ये तुमचा लुक रॉयल दिसेल. सोनेरी काठ असलेली साडी खरेदी केल्यानंतर त्यावर तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता.

बाजारात काठ-पदर पैठणी, सेमी पैठणी आणि येवला पैठणी इत्यादी वेगवेगळ्या फॅबब्रिकमधील साड्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यात काळ्या रंगाची साडी महिला प्रामुख्याने खरेदी करतात.

काळ्या रंगच्या पैठणी साडीला लाल रंगाचा काठ अतिशय उठावदार दिसतो. त्यामुळे लाल रंगाच्या ब्लाऊजवर तुम्ही आरी वर्क करून घेऊ शकता.

पैठणीच्या पदरावरील मोर, पोपट आणि कमळाची नक्षी साडीला पारंपरिक बनवताना. त्यामुळे साडी खरेदी करताना त्यावरील डिझाईन व्यवस्थित पाहावी.






