रात्रीच्या वेळी जेवून झाल्यानंतर सगळ्यांचं बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्याने तोंडातील दुर्गंधी कमी होते. जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्याने आरोग्याला सुद्धा फायदे होतात. रात्रीचे जेवण झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी मूठभर बडीशेप खावी.यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसेच तोंडातील वास देखील निघून जातो. सकाळी उठल्यानंतर अर्धा चमचा बडीशेपचे पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हाला बडीशेप खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
बडीशेप खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
रात्रीच्या जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्यास जेवण सहज पचते. यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होतात.
बडीशेपमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी असते, जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करते. मोतीबिंदू किंवा डोळ्यांचा त्रास असलेल्या लोकांनी नियमित बडीशेपचे सेवन करावे.
अनियमित मासिक पाळी येत असलेल्या महिलांना बडीशेप खावी. बडीशेपमध्ये फायटोएस्ट्रोजेन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात.
बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
बडीशेपमध्ये असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे अंगाला आलेली सूज कमी होते. तसेच संधिवाताचा त्रास असलेल्या लोकांनी नियमित बडीशेप खावी.