लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे. अनुष्काच्या मृत्यूचा गूढ उकलण्यासाठी आता विशेष तपास पथक म्हणजेच SIT ची स्थापना करण्यात आली आहे. नांदेडच्या डॅशिंग पोलीस अधिकारी अर्चना पाटील या तपासासाठी लातुरात दाखल झाल्या असून, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आता वेगाने पावलं उचलली जात आहेत.लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयाचं लेडीज हॉस्टेल. जिथे काही दिवसांपूर्वी अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीचा मृतदेह संशयास्पद रितीने आढळला होता. पलंगाला टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत अनुष्काचा मृतदेह मिळाला, पण तिच्या कुटुंबीयांनी हा घातपात असल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तपासाची चक्रं फिरवली, या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.