दिल्ली कॅपिटल्सचे RCB समोर 167 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
MI vs UPW, WPL 2026 LIVE : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना खेळला जात आहे. नाणेफेक गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने शफाली वर्माच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद १६६ धावा केल्या आहेत. आरसीबीला विजयासाठी १६७ धावा कराव्या लागणार आहेत. आरसीबीकडून लॉरेन बेलने ३ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : INDU19 vs BANU19: U19 World Cup मध्ये अब्रार-वैभव सूर्यवंशी भिडले! चालू सामन्यात गोंधळ; वाचा सविस्तर
नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधनाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्ली कपिटल्सला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. या सामन्यात दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. संघाच्या १० धावांवर ४ विकेट्स गेल्या होत्या. लिझेल ली ४ धावा करून बाद झाली, त्यानंतर लॉरा वोल्वार्डला तर भोपळा ही फोडता आला नाही. कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्स काही खास करू शकली नाही, ती ४ धावा करून माघारी गेली. तर मारिझान कॅपला एक धाव देखील काढता आली नाही. ती ० धावेवर बाद झाली.
लॉरेन बेल आणि सायली सातघरे यांनी दिल्लीच्या डावाला खिंडारच पाडले. सलामीला आलेली शफाली वर्माने एकाकी झुंज देत एक बाजू लावून धरली, तिने ४१ चेंडूत ६२ धावा केल्या. यामध्ये तिने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. तिला लॉरेन बेलने माघारी पाठवले. स्नेह राणाने थोडी झुंज देत २२ धावा केल्या आणि ती बाद झाली. तर लुसी हॅमिल्टनने ३६ धावांचे योगदान दिले. निकी प्रसाद १२ , मिन्नू मणी ५, नंदनी शर्मा १ धावेवर बाद झाले. तर श्री चरणी ११ धावांवर नाबाद राहिली. आरसीबीकडून सायली सातघरे आणि लॉरेन बेल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर प्रेमा रावतने २ आणि नादिन डी क्लर्कने १ विकेट घेतली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), जॉर्जिया वॉल, रिचा घोष (डब्ल्यू), गौतमी नाईक, नादिन डी क्लर्क, राधा यादव, प्रेमा रावत, श्रेयंका पाटील, सायली सातघरे, लॉरेन बेल
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन: शफाली वर्मा, लिझेल ली (डब्ल्यू), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (क), मारिझान कॅप, लुसी हॅमिल्टन, स्नेह राणा, निकी प्रसाद, मिन्नू मणी, नंदनी शर्मा, श्री चरणी
बातमी अपडेट होत आहे….






