निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. या पौष्टिक पदार्थांमध्ये काही बियांचा सुद्धा समावेश होतो. अनेकदा तुम्ही भोपळ्याच्या बिया, अंबाडीच्या बिया, चिया सीड्स इत्यादी वेगवेगळ्या बिया खाल्ल्या असतील, पण तुम्ही कधी सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्या आहेत का? नसतील खाल्ल्या तर नक्की खाऊन पहा. आज आम्ही तुम्हाला सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे.(फोटो सौजन्य-istock)
सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
सूर्यफुलाच्या बियांमध्ये विटामिन इ, अँटी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळून येते. यामुळे केस, नख आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्यामुळे शरीरातील हानिकारक पेशींमुळे शरीराचे होणारे नुकसान टाळता येते.
मोनो-अनसॅच्युरेटेड आणि पॉली-अनसॅच्युरेटेड फॅट्स सुर्यफूलच्या बियांमध्ये आढळून येतात. फायटोस्टेरॉल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी या बिया मदत करतात.
मॅग्नेशियमने समृद्ध असलेल्या सूर्यफुलाच्या बिया निरोगी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी फायदेशीर ठरतात.
सुर्यफूलाच्या बियांचा वापर पुडिंग किंवा वजन कमी करण्यासाठी खाल्ले जाणारे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामुळे शरीरातील वजन नियंत्रणात राहते.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात सूर्यफुलाच्या बियांचा समावेश करावा.तसेच या बियांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते.