(फोटो सौजन्य: Pinterest)
Health Care Tips: लहान मुलांमध्ये का वाढतोय थायरॉईडचा धोका? ‘ही’ लक्षणे दिसल्यास वेळीच करा उपचार,
या डागांच्या भितीमुळेच अनेकजण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळतात. पण आज आम्ही तुम्हाला काही असे सोपे घरगुती उपाय सागंणार आहोत ज्याच्या वापराने तुम्ही तुमच्या पांढऱ्या कपड्यांवरील डाग सहज दूर करु शकता. बाजारात उपलब्ध असलेल्या प्रोडक्टसमध्ये अनेक रसायनांचा वापर केला जातो ज्यामुळे कपड्यांचे फॅब्रिक खराब होऊ शकते. म्हणून घरगुती उपाय करुन पांढऱ्या कपड्यांवरील डाग दूर करणे सर्वात चांगला आणि उत्तम पर्याय ठरु शकतो. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
लिंबू-मिठाचे द्रावण
लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात तर मीठ एक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. विशेषत: हळदीचे डाग काढून टाकण्यासाठी हे द्रावण अधिक फायद्याचे ठरते. यासाठी हळद-मिठाचे द्रावण कपड्यावरी डागांवर लावा आणि ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर साबण आणि पाण्याने कपड्यांना धूवून टाका.
व्हाईट व्हिनेगर
डाग काढून टाकण्यासाठी व्हाईट व्हिनेगरची फार मदत होते. हे एक नॅचरल क्लिनर मानले जाते. कपड्यांवर चहा, काॅफी किंवा हळदीचे डाग लागले असतील तर त्यावर व्हाईट व्हिनेगर ओता आणि किमान १० मिनिटे त्याला तसेच राहू द्या. नंतर साबण आणि पाण्याने कपड्यांना धूवून टाका.
टूथपेस्टचा वापर
ऐकायला थोड विचित्र वाटेल पण टूथपेस्ट देखील कपडयांवरील डाग काढून टाकण्यास मदत करु शकते. यासाठी साध्या पांढऱ्या टूथपेस्टचा वापर करा. यासाठी डागांवर टूथपेस्ट लावा आणि काहीवेळ तसेच राहू द्या. नंतर कपड्याच्या साबणाने आणि पाण्याने कपड्यांना स्वच्छ धुवा.
डिशवॉशिंग लिक्विड
कपड्यांवर जर तेलाचे हट्टी डाग लागले असतील तर त्यावर डिशवाॅशिंग लिक्विडचा वापर करा. डागांवर हे लिक्विड टाकून काही मिनिटे घासा. नंतर पाण्याने कपड्यांना स्वच्छ धूवून काढा. ग्रीसचे डाग लागल्यास तेही या पद्धतीने दूर करता येऊ शकतात.
काॅर्नस्टार्च वापरा
जर कपड्यांवर तेलाचे डाग लागले असतील आणि ते डाग ताजे असतील तर काॅर्नस्टार्चच्या मदतीने त्यांना दूर करा. डाग लागलेल्या ठिकाणी कॉर्नस्टार्च शिंपडा आणि अर्ध्या तासानंतर ब्रशने हलके घासून मग पाण्याने कपड्यांना साफ करा.
शिंक-खोकला येताच लघवी का होते? डॉक्टरांनी सांगितले यामागचे कारण, 99% लोकांना ठाऊकच नाही!
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यामध्ये ॲसिडिक गुणधर्म असतात जे डाग दूर करण्यास मदत करतात. यासाठी अर्धा कप बेकिंग सोडा घेऊन त्यात एक चमचा मीठ, एक चमचा हायड्रोजन पेरॉक्साइड घालून एक पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट डाग असलेल्या भागावर लावा आणि ३० मिनिटानंतर कपड्यांना पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुवून टाका.






