वर्षाच्या बाराही महिने आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. जेवणातील अतिशय महत्वाचे पदार्थ म्हणजे कच्च्या भाज्या आणि फळे. वातावरणात सतत होणारे बदल शरीरासाठी धोक्याचे आहेत. सर्दी, खोकला किंवा इतर गंभीर साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि खूप जास्त थकल्यासारखे वाटते. त्यामुळे शरीरात वाढलेला थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी या भाज्यांपासून बनवलेल्या सॅलडचा आहारात आवश्यक समावेश करावा. सॅलड खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते. (फोटो सौजन्य – pinterest)
'या' सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा

शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यासाठी बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. बीट आणि पनीर कोशिंबीर खाल्ल्यामुळे प्रथिने, लोह, नायट्रेट्स इत्यादी आवश्यक घटक शरीराला मिळतात.

सकाळच्या नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर गाजर बीटचे सॅलड खाऊ शकता. जीवनसत्त्व अ , नायट्रेट आणि तंतुमय पदार्थांनी समृद्ध असलेले सॅलड खाल्ल्यास पोट भरलेले राहते.

भोपळ्याचा वापर आमटी किंवा भाजी बनवण्यासाठी केला जातो. पण कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास भोपळा आणि जवस मिक्स करून बनवलेले सॅलड चवीला अतिशय सुंदर लागेल.

किसून घेतलेल्या कोबीमध्ये सफरचंद तुकडे घालून तुपावर भाजा. त्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, मध मिक्स करा. हे सॅलड आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा खाल्ल्यास शरीराला फायदे होतील.

डोळे आणि पोटाच्या आरोग्यासाठी मुळा बीट सॅलड उत्तम आहे. हे सॅलड तुम्ही भाकरीसोबत किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता. बीट आणि मुळा बारीक किसून तुपावर भाजा आणि त्यात पांढरे तीळ मिक्स करून सॅलड बनवा.






