आई हा प्रत्येकाच्या हृदयाचा हळवा कप्पा आहे. कधी रागावते तर कधी प्रेमाने जवळ घेते ही म्हणजे आई. सगळ्याच आयांचं प्रेम आणि काळजी सारखी असते. असं असलं तरी राशीनुसार प्रत्येक आईचा स्वभाव हा वेगवेगळा असतो.
मेष रास :अग्नी तत्वाची रास असल्याने या राशीचा आईचा स्वभाव काहीसा रागीट असतो. मुलांना शिस्त लावण्यासाठी ती कायमच तत्पर असते.
वृषभ रास :मुलांना खाऊ घालण्यात या आईता विशेष समाधान वाटतं. वृषभ राशीच्या आईच्या हाताला उत्तम चव असते.
मिथुन रास :मिथुन राशीची आई एक हाती अनेक काम करते. मुलांचा डब्बा, शाळेत सोडणं हे सगळं ती एकाच वेळी करते.
कर्क रास:कर्क राशीची आई आपल्या मुलांशी मोकळेपणाने संवाद साधण्यास प्राधान्य देते.
सिंह रास :सिंह राशीची आई मुलांना पुढे जाण्यास कायम प्रोत्साहन देते.
कन्या रास : मुलं आजारी पडू नयेत याची ती कायमच काळजी घेते.
तूळ रास :तूळ राशीच्या आईला आपल्या मुलांना घेऊन बाहेर फिरायला घेऊन जाणं आवडतं.
वृश्चिक रास : वृश्चिक राशीच्या आईला मुलं घाबरतात. ती जेवढी प्रेमळ असते तितकीच रागीटही असते.
धनू रास: धनु राशीच्या आईला प्रवासाची आवड असते त्यामुळे ती नेहमीच मुलांना सहलीसाठी परवानगी देते.
कुंभ रास : कुंभ राशीची आई पारंपरिक विचारांपेक्षा आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारी असते.
मकर रास: मकर राशीच्या आईला आपली मुलं आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावं असं वाटतं.
मीन रास : मीन राशीची आई अत्यंत भावनिक असते. मुलांनी काही दुखावलं तर तिला लगेच जाणवतं.