पाकिस्तानी खेळाडू(फोटो-सोशल मीडिया)
PCB’s big decision : आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा ५ विकेट्सने पराभव केला आणि विजेतेपद जिंकले. हा पराभव पाकिस्तानल चांगलाच जिव्हारी लागला आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. पीसीबीकडून परदेशी टी२० लीगमध्ये भाग घेण्यास पाकिस्तानी खेळाडूंचे एनओसी निलंबित करण्यात आले. आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामागिल बोर्डाने अद्याप काही एक स्पष्ट कारण दिलेले नाही.
सूत्रांनुसार, पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमैर अहमद सय्यद यांच्याकडून २९ सप्टेंबर रोजी खेळाडूंना आणि त्यांच्या एजंटना या निर्णयाची माहिती दणेयात आली. नोटीसमध्ये म्हटले आहे की बोर्डाच्या मान्यतेशिवाय परदेशी लीग आणि स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे एनओसी पुढील सूचना येईपर्यंत निलंबित केले गेले आहे.
एशिया कपचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळवण्यात आला. ज्यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. या स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. या पराभवाच्या दुसऱ्या दिवशी पीसीबीकडून ही कठोर कारवाई करण्यात.
या निर्णयामुळे अनेक टॉप पाकिस्तानी खेळाडूंना नुकसान सोसावे लागणार आहे. यामध्ये बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, फहीम अश्रफ आणि शादाब खान यां खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग आणि इतर परदेशी T20 लीगमध्ये खेळणार होते. परंतु आता त्यांना खेळता येणार नाही. ILT20 फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्यासाठी हरिस रौफ आणि इतर खेळाडूंना देखील शॉर्टलिस्ट करण्यात केले गेले होते. ILT20 लिलाव 1 ऑक्टोबर रोजी UAE मध्ये होणार होता. या लिलावासाठी अठरा पाकिस्तानी खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. परंतु, पीसीबीच्या निर्णयाने हे शक्य होणार नाही.
या वर्षीच्या आशिया कप दरम्यान, पीसीबीने आणखी एक मोठी कारवाई देखील केली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर हस्तांदोलन वादामुळे संघ व्यवस्थापक उस्मान वहाला यांना निलंबित केले गेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहसिन नक्वी यांच्या नेतृत्वाखाली पीसीबीकडून वहाला यांच्यावर कारवाई करण्यात आले. कारण तो वेळेवर वाद सोडवण्यात अयशस्वी ठरला होता.
हेही वाचा : ‘मी कार्टूनसारखा उभा होतो….’, PCB प्रमुख Mohsin Naqvi चे रडगाणे थांबेना! ACC बैठकीत पुन्हा तोडले अकलेचे तारे