धक्कादायक! बोर्ड मिटिंगमध्ये महिलेने अचानक कपडे का काढले अन्.... (Photo Credit- X)
कॅलिफोर्निया: कॅलिफोर्नियामध्ये एका स्कूल बोर्डच्या बैठकीदरम्यान मोठा वाद निर्माण झाला. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांच्या धोरणास विरोध करण्यासाठी एका महिलेने सर्वांसमोर आपले कपडे काढायला सुरुवात केली, ज्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर बोर्डाच्या सदस्यांनी तात्काळ बैठक स्थगित केली.
‘न्यू यॉर्क पोस्ट’च्या रिपोर्टनुसार, मॉम्स फॉर लिबर्टी या स्थानिक संघटनेच्या योलो काउंटी चॅप्टरच्या अध्यक्षा बेथ बॉर्न यांनी १८ सप्टेंबर रोजी डेव्हिस जॉईंट युनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्ट बोर्डाच्या बैठकीत भाग घेतला होता. शाळेतील ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना त्यांच्या लैंगिक ओळखीनुसार लॉकर रूम वापरण्याची परवानगी देणाऱ्या धोरणाला त्यांचा विरोध होता. या धोरणामुळे मुलींना किती असुरक्षित वाटू शकते, हे दाखवण्यासाठीच त्यांनी कपडे काढायला सुरुवात केल्याचे सांगितले.
GOOD FOR HER: A 50-year-old mother was protesting the district’s policy allowing students to use locker rooms based on gender identity. Stripped down to a bathing suit at a California School Board meeting, asking officials: “If you are disrupted by a 50-year-old woman in a… pic.twitter.com/4XHgHPYVB0 — Desiree (@DesireeAmerica4) September 28, 2025
बैठकीदरम्यान बेथ बॉर्न म्हणाल्या, “मी डेव्हिस युनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्टची एक पालक आहे आणि आज मी तुमच्या लॉकर रूमच्या धोरणाबद्दल बोलण्यासाठी आले आहे. सध्या, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाच्या वर्गासाठी कपडे काढायला सांगतो. मी तुम्हाला फक्त हे सांगणार आहे की, जेव्हा मी कपडे काढते, तेव्हा कसं वाटतं.”
त्यानंतर बेथ बॉर्न यांनी कपडे काढायला सुरुवात करताच बैठकीत एकच खळबळ उडाली. तातडीने बोर्डाच्या सदस्यांनी बैठक स्थगित केली. त्यानंतर एका वेगळ्या विषयावर पुन्हा बैठक सुरू करण्यात आली.
बेथ बॉर्न सुरुवातीपासूनच या धोरणाबद्दल आवाज उठवत आहेत. गेल्या तीन वर्षांत त्यांनी अनेक बैठकांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कृतींवर LGBTQ+ व्यक्ती आणि शिक्षकांच्या छळाचे आरोप करत त्यांच्यावर टीकाही झाली आहे.