महाभारतात गांधारीला १०० पुत्र होती पण तुम्हाला माहिती असेल की एका गर्भातून इतके पुत्र तयार होणे हे अशक्य आहे. मग गांधारीला १०० कौरव झाले तरी कसे? असा प्रश्न मनात येणे सामान्य गोष्ट आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? टेस्ट ट्यूब बेबीसारखी अनोखी आधुनिक पद्धत जी आता ह्यात आली आहे. ती महाभारतात आधीच लिहली गेली आहे.
How Gandhari gave Birth to 100 Children? (फोटो सौजन्य - Social Media)

महाभारत हे व्यासांनी लिहले आहे. व्यास कोण? तर गांधारीचे सासरे. व्यास तसे कुरुवंशी पण ते वनातच राहत असत. गांधारीला मूल होत नव्हता.

कुंतीला मुलं होऊ लागली पण गांधारीला झाले नाही याची खंत तिच्या मनात चावत होती. तेव्हा व्यास कुरुप्रासादात आले असता. गांधारीने त्यांची मनोभावे सेवा केली तेव्हा व्यासांनी तिला वर मागण्यास सांगितला. गांधारीने त्यांना तिला शंभर पुत्रप्राप्ती होण्याचे वर मागितले. व्यासांनी तिला शंभर पुत्रांचा वर दिला. तसेच प्रसूतीच्यावेळी व्यासांना बोलावण्याचे आवाहानही केले.

पाहता-पाहता दीड-दोन वर्षे उलटली पण गांधारीला मुलंच झालं नाही. गर्भ तसेच्या तसे तम फुगलेले. व्यासांना बोलवण्यात आलं. व्यासांनी पाहिलं तर गर्भात मासाचा गोळा होता. व्यासांना तेच हवं होतं. तो मासाचा गोळा गर्भातून बाहेर काढण्यात आला.

त्याचे शंभर तुकडे करण्यात आले आणि एका स्वच्छ नलिकेत वरून झाकणाने घट्ट बंद करून आणखीन वर्षांसाठी ठेवण्यात आले. दीड ते दोन वर्षांनी ते झाकण खोलण्यात आले, त्यातून पहिला निरोगी बाळ म्हणजेच ज्याच्यामुळे महाभारत घडला असा 'दुर्योधन' बाहेर काढण्यात आला.

असे उर्वरित ९९ बाळही काढण्यात आली. सगळे निरोगी होते. त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे! कौरवांना विरजा नावाची एक बहीणही होती. ती १०१ वी होती.






